मोठमोठ्या नेत्यांनाही लाजवेल या २३ वर्षाच्या मुलाची समाजसेवा, तुम्ही पण ठोकाल सलाम

0

 

 

आपण मेहमीच स्वता: कुटुंबाचा विचार करत असतो, स्वता:च्या गरजेच्या गोष्टी घेण्यासाठी तडफड करत असतो, पण आज या समाजात काही असे लोक पण आहेत, जे आपल्या सोबच गरीब आणि गरजू लोकांचा विचार करत असतात.

आजची गोष्ट अशा तरुणाची आहे, ज्याने संस्था उघडली असून ती संस्था गरीब आणि गरजू मुलांच्या मदतीसाठी दिवसरात्र काम करत आहे. झारखंडमधल्या रांचीमध्ये राहणाऱ्या २३ वर्षाच्या या तरुणाचे नाव रजत विमल असे आहे.

रजत जेव्हा १० वीत होता, तेव्हा त्याने फॉलेन लीव्स नावाची संस्था सुरु केली होती. सध्या रजत एमबीए करत असून आता त्यांच्या या संस्थेत त्यांचे मित्र आयुष बुधिया, सौरव चौधरी, विवेक अग्रवाल यांच्यासोबतच ७० तरुण-तरुणी जोडले गेलेले आहे.

या संस्थेचा उद्देश गरीब आणि अनाथाश्रमातल्या मुलांना चांगले जीवन देण्याचा प्रयत्न करणे आहे. मुलांना चांगले शिक्षण देण्यासोबतच त्यांना विविध प्रकारचे कौशल्य शिकवण्याचे काम ते करत आहे.

ही संस्था गरीब आणि गरजू मुलांसाठी वर्षभरात बरेच इव्हेंट ठेवतात, तसेच त्यांनी महाबाजार नावाची एक मॉलचा इव्हेंट राबवतात. सामान्य व्यक्तीसाठी मॉलमध्ये जाणे साधी गोष्ट असेल पण गरीब मुलांना मॉलचा एक वेगळा अनुभव देण्याचे काम करत आहे.

या मॉलमध्ये कपडे, बुट-चप्पला, वह्या पुस्तके यांसारख्या सर्व गोष्टी असतात. इथे मुलं हवी ती गोष्ट विकत घेऊ शकतात. यासाठी मुलांना संस्थेकडून एक नकली डेबीट कार्ड दिले जाते. त्याची लिमिट १ हजार रुपयांची असते, त्यामुळे मुलं सर्वात आधी आपल्या गरजेच्या वस्तु विकत घेतात, यामुळे मुलांना पैसे कसे वाचवायचे हेही शिकायला मिळते.

या महाबाजारची लहान मुलं आतुरतेने वाट पाहत असतात, कारण यामध्ये ऑफर लावलेल्या असतात. विशेष म्हणजे या मॉलमध्ये मुलं आपल्या आई-वडिलांसाठीही खरेदी करु शकतात.

महाबाजार जेव्हा सुरु करायचा असतो, त्याच्या दोन महिन्याआधीपासूनच ही टीम कामाला लागते. शहरातून वेगवेगळ्या प्रकारच्या सामान खरेदी करतात, तसेच समाजसेवक असणारे लोकही या कामासाठी त्यांची मदत करत असतात. रजतने सुरु केलेल्या या कामामुळे अनेक गरीब मुलांची मदत झाली, त्यामुळे तो आता अनेक लोकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.