‘छम छम करता है ये नशीला बदन’ या गाण्यासोबतचे राज ठाकरे यांचे कनेक्शन माहितीये का?

0

 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आजच्या तरुण पिढीत एक वेगळीच ओळख आहे. राज ठाकरेंची राहण्याची, बोलण्याची, सभांमध्ये भाष्य करण्याची स्टाईल महाराष्ट्रातच काय तर पूर्ण देशातील तरुणांना वेड लावून गेली आहे.

राज ठाकरे जरी राजकारणात असले तरी त्यांनी स्वतःला नेहमीच सांस्कृतिक, सामाजिक गोष्टींशी जोडून ठेवले आहे. इतकेच नाही तर त्यांचे कलावर असलेले प्रेम देखील सर्वांना माहितीये. जाणून घेऊया त्यांच्या अशाच एका किस्स्याबद्दल.

२००४ साली ‘अगं बाई अरेच्चा’ नावाचा केदार शिंदे यांचा सिनेमा आला होता. त्यात संजय नार्वेकरांनी काम केले होते, अजय अतुल यांनी त्या सिनेमाला संगीत दिले होते. या चित्रपटातली अनेक गाणी सुपरहिट ठरली होती. त्यात मन उधाण वाऱ्याचे, मल्हारवारी, असे काही गाणे प्रसिद्ध झाले होते.

या चित्रपटातलेच एक गाणं होते, ते म्हणजे ‘छम छम करता है ये नशीला बदन’ हे गाणे एक आयटम सॉंग होते, यात सोनाली बेंद्रे दिसून आल्या आहे.

अजय अतुल हे संगीतकार नुकतेच तेव्हा प्रसिद्धीत आले होते. या सिनेमाला अजय अतुल यांनीच गाणे कंपोज करून दिली होते. तेव्हा या सिनेमाची गाणी पूर्ण तयार झाली होती. तेव्हा ही गाणी अजय अतुल यांनी जवळचे मित्र राज ठाकरे यांना ऐकवली.

राज ठाकरेंना ही गाणी अत्यंत आवडली. मात्र ‘छम छम करता है ये नशीला बदन’ या गाण्यात राज ठाकरे यांना काही तरी कमी वाटली. यासाठी राज ठाकरे यांनी हे गाणे पुन्हा पुन्हा ऐकले पण त्या गाण्यात काही कमी आहे, असे त्यांना जाणवत होते.

तेव्हा राज ठाकरेंनी लक्ष्मीकांत प्लारेलाल यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी या गाण्याबद्दल राज ठाकरेंनी प्लारेलाल यांना या गाण्यात मार्गदर्शन करणार का? असे विचारले असता. तेव्हा प्यारेलाल यांनी होकार दिला.

राज ठाकरे अजय अतुल यांना सोबत घेऊन प्यारेलाल यांना भेटायला गेले. तेव्हा हे गाणे प्यारेलाल यांना ऐकवण्यात आले. तेव्हा त्यांनाही या गाण्यात कुठली कमी वाटली. या गाण्यासंबंधी २-४ बैठका झाल्या.

या गाण्यात प्यारेलाल यांनी एक या गाण्याच्या सुरुवातीला काही चेंजेस करण्यात सांगितले. या गाण्याच्या सुरुवातीला प्यारेलाल यांनी ट्रम्पएडचा आवाज देण्यास सांगितला. त्यामुळे या गाण्याला चांगला फील येईल, असे प्यारेलाल यांनी सांगितले. तेव्हा या गाण्याच्या सुरवातीला ट्रम्पएडचा आवाज टाकण्यात आला.

तेव्हा प्यारेलाल यांनी त्यात ट्रम्पएडचा आवाज टाकला. गाणं पूर्ण झालेले होते. तेव्हा राज ठाकरेंनी हे गाणे पुन्हा ऐकले. तसेच प्यारेलाल यांना विचारले की, हे गाणे पूर्ण वाटतेय का? तेव्हा प्यारेलाल यांनी होकार दिला. तेव्हा राज ठाकरेंना ते गाणं पूर्ण झालं आहे, हे पटले.

पुढे हे गाणं चित्रपटात वापरण्यात आले. या गाण्यात सोनाली बेंद्रे यांनी नृत्य केले आहे. या गाण्याची कोरिओग्राफी प्रसिद्ध कोरिओग्राफर फराह खान यांनी केली होती. हे गाणे त्यावेळी प्रचंड हिट झाले होते, आजही या गाण्याची तितकीच क्रेझ आहे.

हे गाणे हिट होण्यामागे राज ठाकरे यांचा मोठा रोल होता. राज ठाकरे व्यंगचित्रकार आहे, त्यांना सिनेमाची देखील आवड हे सर्वांनाच माहीत आहे. मात्र या गाण्यामुळे त्यांची संगीतातली आवड देखील दिसून येते.

Leave A Reply

Your email address will not be published.