‘बाबा चमत्कार’ची भूमिका साकारणारे राघवेंद्र कडकोळ यांचे निधन; शेवटचे दिवस काढले होते वृद्धाश्रमात

0

 

झपाटलेल्या या प्रसिद्ध मराठी चित्रपटात बाबा चमत्कारची भूमिका साकारणारे जेष्ठ अभिनेते राघवेंद्र अडकोळ यांचे आज (गुरुवारी) वृद्धपकाळाने निधन झाले आहे. ते ८३ वर्षांचे होते.

अत्यंत शांत स्वभाव, कलेवर गाढ श्रद्धा, नैसर्गिक अभिनय अशा अनेक गोष्टींमुळे लोकांच्या ते नेहमीच स्मरणात राहतील. झपाटलेला या मराठी चित्रपटात त्यांनी बाबा चमत्कारची भूमिका साकारली होती, ती प्रचंड गाजली होती.

कडकोळ यांनी आपल्या अभिनय क्षेत्राचा प्रवास कृष्णधवल या चित्रपटापासून सुरू केला होता. रंगभूमीवर असताना त्यांनी काशीनाथ घाणेकर, शरद तळवळकर यांसारख्या दिग्गज कलाकारांसोबत त्यांनी केले होते.

त्यांना लहानपणापासूनच वाचनाची प्रचंड आवड होती. नववीत शिकत असताना त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे लिखाण प्रचंड वाचले, त्यामुळे त्यांच्या विचारांचा प्रभाव कडकोळ यांच्यावर पडला होता. त्यामुळे त्यांनी आपले शिक्षण सोड देशसेवा करण्याचा निर्णय घेतला.

त्यावेळी त्यांनी नौदलात भरती होण्यासाठी प्रयत्न सुरू केले. तसेच परीक्षा पास करून ते नौदलात भरती झाले. त्यावेळी त्यांना एकदा आयएनएस विभागाच्या टीमसोबत पाठवण्यात आले होते.

तिथला समुद्र आणि तिथे असणाऱ्या बोटीपाहुन ते भारावून गेले होते. पण त्याचवेळी सर्व टेस्ट झाल्या असल्यातरी त्यांना पुन्हा एकदा मेडिकल टेस्टसाठी पाठवण्यात आले आणि तेव्हा त्यांच्या एका कानात दोष असल्याचे सांगत त्यांना घरी पाठवण्यात आले होते.

त्यानंतर त्यांनी पुन्हा शिक्षण घेण्यास सुरुवात केली. तसेच त्यांनी नाटकात काम करायला सुरुवात केली. पुढे त्यांनी नाटक, चित्रपट, मालिका अशा वेगवेगळ्या मंचावर आपल्या कलेची छाप सोडली.

राघवेंद्र कडकोळ यांनी अश्रूंची झाली फुले, रायगडला जेव्हा जाग येते, यांसारख्या नाटकांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या होत्या. पण त्यांचा झपाटलेला चित्रपटाला ओम फट् स्वाहा हा मंत्र प्रचंड गाजला होता.

राघवेंद्र कडकोळ यांनी शेवटचे दिवस खूप हलकीत काढले. प्रसिद्धी मिळाली पण पैसा कमवता आला नाही, याची खंत त्यांना नेमी होती. ते त्यांच्या पत्नी लतिका कडकोळ यांच्यासोबत पुण्याच्या वृद्धाश्रमात राहत होते.

Leave A Reply

Your email address will not be published.