डिलिव्हरी बॉयचे काम करताना सुचली भन्नाट आयडिया, आता करतोय लाखोंची कमाई

0

 

 

व्यवसाय करायचा असेल तर तुमच्याकडे त्यासाठी एक भन्नाट आयडिया असावी लागते किंवा मग तुमची व्यवसाय करण्याची एक अनोखी पद्धत असावी लागते, तरच तुमचा व्यवसाय यशस्वी होऊ शकतो.

आज आम्ही तुम्हाला अशाच एका मुलाची गोष्ट सांगणार आहोत, जो आधी एक डिलिव्हरी बॉय होता पण आता तोच मुलगा त्याच्या भन्नाट कल्पनेमुळे लाखोंची कमाई करत आहे.

राजस्थानच्या जयपुरमध्ये राहणाऱ्या या मुलाचे नाव रघूवीर सिंग चौधरी असे आहे. त्याची परिस्थिती आधी खुप गरीबीची होता, त्यामुळे त्याला त्याचे शिक्षण पुर्ण करता आले नाही आणि त्याने काम करण्यास सुरुवात केली.

रघूवीरने ऍमेझॉन कंपनीत डिलिव्हरी बॉयचे काम सुरु केले. डिलिव्हरी बॉयचे काम करताना त्याला महिन्याला ९ हजार रुपये पगार मिळत होता, पण तो घर सांभाळण्यासाठी पुरेसा नव्हता. अशात हे काम करण्यासाठी त्याच्याकडे दुचाकी सुद्धा नव्हती, त्यामुळे तो सायकलच्या मदतीनेच हे काम करायचा.

काही ऑर्डर खुप लांब असल्यामुळे तो थकून जायचा आणि त्यामुळे तो एखाद्या टपरीवर चहा प्यायचा. काहीवेळा त्याला एखाद्या टपरीवरचा आवडायचा नाही आणि तो पुन्हा चांगला चहा भेटेल अशी टपरी शोधायचा, तेव्हा त्याच्या लक्षात आले की चांगला चहा शोधने हे सुद्धा सोपे काम नाहीये आणि अशा अडचणी अनेक लोकांना येत असतील. तिथूनच त्याला त्याच्या व्यवसायाची कल्पना सुचली.

रघूवीरने आपल्या जवळपासच्या दुकानांशी संपर्क साधला आणि चहा विकण्याचे काम सुरु केले, त्याने तयार केलेला चहा लोकांना इतका आवडला की दिवसेंदिवस ऑर्डर मिळत, गेल्या आणि त्याने खुप कमीवेळात तो १०० पेक्षा जास्त दुकानात चहाची पोहचवू लागला.

आज रघूवीरचे जयपुरमध्ये ४ पेक्षा जास्त टी-स्टॉल आहे. त्यांना दिवसाला १००० ते १२०० चहाच्या ऑर्डर्स मिळतात. त्याने चहाची डिलिव्हरी करण्यासाठी बाईक्स सुद्धा घेतल्या आहे. त्याने ग्राहकांची ऑर्डर घेण्यासाठी एक ऍपसुद्धा तयार केले आहे, तसेच तो व्हॉट्सऍपवर सुद्धा चहाची ऑर्डर घेतो, या व्यवसायातून तो महिन्याला १ लाख रुपयांपर्यंत कमवत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.