भारतातील या राजकुमारीला लोक म्हणायचे सुंदरतेची देवी, जगातील टॉप १० सुंदर स्त्रीयांमध्ये होते तिचे नाव

0

अशा अनेक राण्या आणि राजकन्या तुम्ही ऐकल्या असतीलच ज्या त्यांच्या सौंदर्यासाठी खुप प्रसिद्ध होत्या. इतिहासाच्या पानांमध्ये त्यांचे सौंदर्य अजरामर आहे. अशाच राजकुमारीबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ज्यांची गणना जगातील सुंदर महिलांमध्ये केली जात होती.

इतकेच नाही तर या राजकुमारीला हॉलिवूडच्या चित्रपटांसाठी अनेक ऑफर्सही मिळाल्या. तुर्कीच्या तुर्क राजवंशातील शेवटच्या राणी निलोफर यांना सौदर्याची देवी असे लोक म्हणायचे. त्यांचा जन्म तुर्कीची राजधानी इस्तानबूलच्या राजवाड्यामध्ये झाला होता.

निलोफर यांच्या जन्माच्या वेळी तुर्की राजघराण्याने जोरदार युद्ध सुरू होते आणि त्यांचे साम्राज्य कोसळू लागले. निलोफर यांनी वयाच्या २ ऱ्या वर्षी आपले वडील गामावले. वयाच्या सातव्या वर्षी त्यांनी फ्रान्समध्ये आईसह तुर्की सोडले. त्यांचे फ्रान्समधील जीवन कठीण व सामान्य लोकांसारखे झाले होते.

निलोफरने त्यांच्या आयुष्यात बरेच चढऊतार पाहिले. पण निलोफर नशीबवान होत्या आणि जगातील सर्वात श्रीमंत राजघराण्यातील हैदराबाद निजाम घराण्यात त्यांचे लग्न झाले. हैदराबादच्या शेवटच्या निजामाने निलोफरला आपला दुसरा मुलगा आजम येह याच्याशी लग्न करण्यासाठी निवडले.

१९३१ मध्ये लग्नानंतर निलोफर हैदराबादला गेल्या होत्या. असे म्हटले जाते की निलोफर केवळ सुंदरच नाही तर त्यांच्याकडे पाहिल्यानंतर कोणीही त्यांच्याकडे आकर्षित होत असे. लग्नानंतर निलोफर हैदराबादला आल्या तेव्हा निजामच्या कुटूंबात अशी प्रथा होती की महिलांना आपला चेहरा झाकून ठेवावा.

पण त्या कधीही पडद्याच्या मागे राहिल्या नाहीत उलट निजामाच्या बायकांच्या सार्वजनिक जीवनाची बंद दारे त्यांनी उघडली. नीलोफर यांनी हैदराबादच्या पार्टी, सेलिब्रेशन आणि कार्यक्रमांना हजेरी लावायला सुरुवात केली. त्यांना काही कार्यक्रमांमध्ये मुख्य अतिथी म्हणून नेहमी बोलावले जात असे.

पण निलोफरचे वागणे पाहून बेगम वधू पाशा निलोफर नेहमी नाराज राहायच्या. असे म्हटले जाते की, बेगम यांनी निलोफरला विष देऊन मारण्याचा प्रयत्न केला होता. निलोफर ही राजघराण्यातील एक फॅशन दिवा होती. तिच्या परिधान केलेल्या साडीची छायाचित्रे न्यूयॉर्क फॅशन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये आहेत.

निलोफरची साडी एका मोठ्या फ्रेंच फॅशन कंपनीने बनविली होती. पण एक वेळ अशी आली की त्याने साडी सोडली आणि वेस्टर्न कपडे घालायला सुरवात केली. १८४८ मध्ये हैदराबादचे भारतात विलीनीकरण झाले तेव्हा निलोफर त्यावेळी फ्रान्सला जात असत आणि पॅरिसमध्ये काही काळ राहिल्या होत्या.

जेव्हा निलोफर फ्रान्समधून हैदराबादला परत आल्या नाहीत तेव्हा त्यांच्या पतीने पुन्हा लग्न केले. १९५२ मध्ये, त्यांचा घटस्फोट झाला. ज्यामध्ये मेहेर म्हणून त्यांना खूप मोठी रक्कम मिळाली. हैदराबादमध्ये महिला आणि मुलांसाठी रुग्णालय तयार करण्यासाठी त्यांनी या पैशांचा मोठा हिस्सा दिला.

नीलोफर तिच्या काळातील एक सुंदर स्त्री होती. अनेक जागतिक मासिकांनी तिला जगातील १० सुंदर महिलांमध्ये निवडले होते. आपल्या पतीला घटस्फोट दिल्यानंतर ती आपल्या आईबरोबर फ्रान्समध्ये राहायला गेली. निलोफरला त्या काळात हॉलिवूड कडून ऑफरसुद्धा मिळाल्या, पण तिने काम करण्यास नकार दिला होता.

काही काळानंतर तिने अमेरिकन तरूण एडवर्ड पोपशी लग्न केले. राजकुमारी निलोफर यांचे १९८९ साली निधन झाले. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कळवा. जर ही माहिती आवडली असेल तर पुढे पाठवायला विसरू नका.

Leave A Reply

Your email address will not be published.