दूरदर्शनवर मिळाली शेती करण्याची भन्नाट आयडिया, आता वर्षाला कमावतोय १.२५ कोटी

0

मशरूमबाबत जर काही वर्षांपुर्वी कोणाला विचारले असते तर कोणालाही या खाद्यपदार्थाबाबत माहिती नव्हती. पण आज बऱ्याच ठिकाणी मशरूम मोठ्या आवडीने खाल्ले जाते. मशरूमच्या शेतीबाबत जर तुम्हाला माहिती असेल तर यातून शेतकरी आजच्या घडीला लाखो रूपये कमवत आहेत.

आज आम्ही तुम्हाला आशाच एका शेतकऱ्याबद्दल सांगणार आहोत ज्याला पंजाबचा मशरूम किंग म्हणतात. कारण हा शेतकरी मशरूम शेतीतून वर्षाला १.२५ कोटी रूपये कमवत आहे.

१९९२ मध्ये संजीव सिंह एकमेव असे शेतकरी होते जे त्यावेळी मशरूमची शेती करत होते. सुरूवातीला त्यांना अनेक अडचणी आल्या. पण आता ते यातून भरघोस उत्पन्न मिळवत आहेत.

द बेटर इंडियाला बोलताना त्यांनी सांगितले की त्यावेळी ते फक्त २५ वर्षांचे होते. त्यावेळी त्यांना सर्वात आधी मशरूम शेतीबाबत दूरदर्शनवर माहिती मिळाली. दूरदर्शनवरील एक कार्यक्रमातून त्यांना मशरूम शेती करण्याची प्रेरणा मिळाली. मशरूम शेतीसाठी जास्त जागेची गरज पडत नाही.

आजच्या काळात व्हर्टिकल फार्मिंग पद्धतीने कमीत कमी जागेत जास्ती जास्त शेती केली जाऊ शकते. मशरूमच्या शेतीसाठी मातीची गरज नसते. यात कम्पोस्ट खत टाकावे लागते. ज्यावेळी संजीव शेती करत होते तेव्हा यामध्ये जास्त पद्धती विकसित झाल्या नव्हत्या.

त्यामुळे त्यांनी एका खोलीत मेटलच्या रॅकवर शेती सुरू केली होती. त्याआधी त्यांना पंजाबच्या विश्वविद्यालयातून १ वर्षांचा कोर्स केला. त्यांनी अनेक ठिकाणांहून शेतीची सर्व माहिती गोळा केली.

जास्त माहिती नसल्याने सुरूवातीला त्यांच्याकडून काही चूका झाल्या. त्यांना बिया दिल्लीवरून मागवाव्या लागत होत्या. ८ वर्षे मेहनत केल्यानंतर त्यांना यश आलं. २००१ मध्ये त्यांना यातून फायदा होऊ लागला.

२००८ मध्ये त्यांनी स्वताची प्रयोगशाळा सुरू केली आणि ते स्वताच बिया विकू लागले. काही दिवसांत त्यांनी २ एकरात मशरूमची लागवड केली. या बिया त्यांनी दुसऱ्या राज्यात विकण्याचा व्यवसाय सुरू केला.

एका दिवसाला ७ क्विंटल मशरूमचे उत्पादन होऊ लागले. आता त्यांचे वार्षिक उत्पन्न दिड कोटींच्या आसपास आहे. २०१५ मध्ये पंजाब सरकारने त्यांचा सत्कार केला होता. पंजाबमध्ये त्यांना मशरूम किंग म्हणून ओळखले जाते.

Leave A Reply

Your email address will not be published.