महिला दिन विशेष: शिक्षण चौथी पास, वय ५२ वर्षे, वार्षिक उलाढाल तब्बल ३ कोटी

0

आज जागतिक महिला दिन. त्यानिमित्ताने आज आम्ही तुम्हाला पुण्यातील एका महिलेची यशोगाथा सांगणार आहोत. फक्त ४ थी पास असलेली महिला वर्षाला किती रुपयांची उलाढाल करत असेल? तुमचे उत्तर कोटींच्या घरात तर नक्कीच नसेल.

पण पुण्यातील एक महिलेने हा कारनामा करून दाखवला आहे. त्यामुळे तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की ही महिला कोण आहे? असा कोणता व्यवसाय ती करते? या सर्व प्रश्नांची उत्तर आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.

मंगल दळवी यांनी फक्त चौथीपर्यंत शिक्षण घेतले आहे. पण त्यांना सगळ्या रोपांची इंग्रजी नावे तोंडपाठ आहेत. ५२ वर्षी त्यांची वार्षिक उलाढाल ३ कोटींची आहे. तुम्हाला कदाचित विश्वास बसत नसेल पण त्यांच्या या योगदानामुळे पुर्ण दळवी कुंटुंबाची गाडी रूळावर आली आहे.

परिस्थिती बेताची असल्यामुळे लहाणपणी त्यांचे शिक्षण सुटले पण रोपवाटीकेच्या छंदाने त्यांना मालामाल बनवले. त्यांचा भाऊ रोपवाटिकेचे शिक्षण घेत होता. नंतर त्याने रोपवाटीकेचा व्यवसाय सुरू केला. त्यांनाही त्याची आवड निर्माण झाली.

त्याला मदत करता करता त्यांनीही सगळे काम शिकून घेतले. पण त्यांना अपेक्षित असे उत्पन्न मिळत नव्हते. त्यांनी आपल्या पतीला या व्यवसायाबद्दल सांगितले आणि मंगला दळवी यांच्या पतीनेही त्यांना साथ दिली.

यानंतर त्यांनी ५ गुंठ्यात गुलाबाच्या फुलांची रोपे लावली. बघता बघता त्यांचा व्यवसाय वाढत गेला आणि आज त्यांची वार्षिक उलाढाल ३ कोटींची आहे. त्यांना इतके मोठे भांडवल होईल याची कल्पनाही नव्हती. लग्नापुर्वी मारूती दळवी यांची जेमतेम ३० हजारांची वार्षिक उलाढाल होती.

पण १९९० मध्ये मंगला दळवी त्यांच्या आयुष्यात आल्या आणि त्यांनी ५ गुंठ्यात रोपवाटिकेला सुरूवात केली. बघता बघता हा व्यवसाय १० एकरांमध्ये पसरला. आईची प्रेरणा घेऊन मुलानेही प्रेरणा घेतली आणि स्वता बीएससी ऍग्रीचे शिक्षण घेतले आणि तो ही आता आईला हातभार लावत आहे.

मंगला दळवी यांनी ४० जणांना रोजगार दिला आहे. शिवाय परिसरातील गरजूंनाही त्यांनी या व्यवसायाचे प्रक्षिक्षण दिले आहे. त्यांची दखल प्रशासनानेही घेतली आहे आणि मंगला दळवी यांच्या नावाची शिफारस राज्य सरकारकडे पुरस्कारासाठी करण्यात आली आहे.

यातून आपल्याला हे कळते यश संपादन करण्यासाठी मोठमोठ्या पदव्यांची गरज नसते फक्त इच्छाशक्तीच्या आणि जिद्दीच्या जोरावर माणूस गगणाला गवसनी घालू शकतो.

Leave A Reply

Your email address will not be published.