पुणेकरांचा नादच नाय! मायलेकींनी बनवली रोझ वाईन, आता पुर्ण जगातून वाईनला मागणी

0

वाईनप्रेमींसाठी ही महत्वाची बातमी आहे. कारण आता तुम्हाला गुलाबाच्या वाईनची चव चाखता येणार आहे. आता तुम्ही गुलाबाच्या वाईनचा आस्वाद घेऊ शकता. कारण पुण्यातील उद्योजिका जयश्री यादव आणि त्यांची मुलगी कश्मिरा यादव यांनी गुलाबाच्या पाकळ्यांपासून वाईनची निर्मिती केली आहे.

हे संशोधन केल्यानंतर त्यांना अनेक कंपन्यांकडून पेटंट मिळाले आहे. फुलापासून वाईन निर्मिती करणाऱ्या या मायलेकी जगातील पहिल्याच उद्योजिका ठरल्या आहेत. त्यांना जगातील १४० देशातून वाईनसाठी मागणी आली आहे.

याआधीही त्यांनी अशा अनेक गोष्टी फुलापासून बनवल्या आहेत. त्यामध्ये गुलकंद, सरबत तसेच गुलाबपाणी यांचा समावेश आहे. काही किलो गुलकंदाचा हा बिझनेस आता टनापर्यंत पोहोचला आहे.

मायलेकी मिळून आता अनेक टनांमध्ये गुलकंदाचे उत्पादन करत आहेत. सुरूवातीला त्यांनी शेतकऱ्यांकडून गुलाब विकत घेतले होते. पण आता त्यांनी स्वताची गुलाबाची बाग फुलवली आहे.

हा व्यवसाय करत असताना त्यांच्या डोक्यात गुलाबाच्या पाकळ्यांपासून गुलकंद बनविण्याची आयडिया आली. त्यांनी गुलाबावर संशोधन चालूच ठेवले. काही काळानंतर त्यांनी गुलाबाच्या पाकळ्यांपासून वाईनची निर्मिती केली.

आता त्यांच्या या गुलाबाच्या वाईनला पेटंट मिळू लागले आहे आणि केंद्र सरकारनेही त्यांना पेटंटचे प्रमाणपत्र दिले आहे. त्यांनी गुलाबापासून वाईन तयार करण्यास २००७ मध्ये सुरूवात केली होती. त्यांनी घरातच गुलाबावर अनेक प्रयोग केले.

तज्ञांनी या वाईनची खुप प्रशंसा केली आणि ते म्हणाले की आजपर्यंत अशा प्रकारची वाईनची चव त्यांनी चाखली नव्हती. यादव यांनी सांगितले की, त्यांना आईवडिलांनी दिलेल्या शिक्षणाचा खुप फायदा झाला. तीच शिकवण मी माझ्या मुलींना दिली.

मोठी मुलगी ऑस्ट्रेलियात आहे आणि लहान मुलगी मला येथे वाईन निर्मितीसाठी मदत करत आहे. माझी मेहनत सार्थकी लावण्यात त्यांचा खुप मोठा वाटा आहे. पुढे यादव म्हणाल्या की, चाकणमधील एमआयडीसीमध्ये अद्यावत रिफायनरी उभारण्यात येणार आहे.

याच पाच हजार लिटरची क्षमता असणाऱ्या तीन टाक्या आणि एक हजार लिटर क्षमता असणाऱ्या तीन टाक्या बसविण्यात येणार आहेत. या पद्धतीने एकूण अठरा हजार लिटर रोझ वाईन तयार होणार आहे.

वाईन भरण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या बाटल्या ह्या इटली येथून मागवण्यात येणार आहे, असे यादव म्हणाल्या आहेत. त्यांच्या या संशोधनाचे पुर्ण जगातून कौतुक केले जात आहे. केवळ त्यांच्यामुळे वाईनप्रेमींना आता रोझ वाईन चाखता येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.