डिप्रेशनमध्ये असणाऱ्या लोकांच्या गोष्टी ऐकून त्यांनाच पैसे देतो ‘हा’ तरुण; कारण वाचून कौतुक वाटेल

0

 

आजकाल अनेक लोक आपल्याला मानसिक ताण-तणावात दिसुन येतात. अनेकदा काही लोक आपले दु:ख मनात तसेच ठेवतात, कारण त्यांच्या मनातलं ऐकायलाच कोणी नसतं.

आजची ही गोष्ट अशा एका तरुणाची आहे, जो डिप्रेशनमध्ये असलेल्या लोकांच्या गोष्टी ऐकून घेतो आणि त्यांना १० रुपये देतो. पुण्यात राहणाऱ्या या तरुणाचे नाव राज डागवार असे आहे. २२ वर्षे वय असणारा राज एक इंजिनियर आहे.

अनेक लोकांना आपल्या मलातल्या गोष्टी सांगायच्या राहतात, पण अनेकांना आपल्या मनातले लोकांना सांगणे कठिण जाते. अशा लोकांसाठी राजने हि संकल्पना मांडली आहे.

राज पुण्यातल्या फर्ग्युसन कॉलेजच्या बाहेर एक प्लेकार्ड घेऊन उभे राहतो. त्यावर मला तुमची गोष्ट सांगा, मी तुम्हाला १० रुपये देईल, असे लिहिलेले असते. राज दिवसभर फुटपाथवर पाच तास थांबतो आणि वेगवेगळ्या लोकांच्या मनातील गोष्टी जाणून घेतो.

राज संध्याकाळी ६ वाजेपासून रात्री ११ वाजेपर्यंत लोकांच्या गोष्टी ऐकत राहतो. राज ज्या ज्या लोकांना भेटला आहे, त्यांच्या सगळ्यांच्या गोष्टी पुर्ण ऐकूण घेतो आणि त्या गोष्टी लक्षातही ठेवतो.

लॉकडाऊनमध्ये खुप लोक एकटे पडले आहे. एकट्यापणामुळे अनेक लोक डिप्रेशनमध्ये गेले आहे. मी सुद्धा २०१९ मध्ये अशा स्थितीत होतो की, मला माझ्या काही गोष्टी कुटूंबियांना सांगता येत नव्हत्या. त्यामुळे मलाही एका सल्लागाराची गरज पडली होती, असे राजने म्हटले आहे.

अशाप्रकारे रस्त्यावर उभे राहून लोकांच्या गोष्टी ऐकणे सोपे काम नसते. अनेक लोक तुम्हाला क्रिटीसाईझ करतात, तर काही लोक तुमच्याकडे आश्चर्याने बघतात. पण सोशल मिडीयावर माझी हि संकल्पना अनेकांना आवडली, असून अनेकांनी त्याला प्रतिसाद दिला आहे, असेही राजने म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.