कॉलेजमध्ये सुचली आयडीया अन् सुरु केला स्टार्टअप, आता ९ महिन्यात केली ५० लाखांची कमाई

0

 

 

आजकाल तरुणांमध्ये नोकरी करण्यापेक्षा स्वत:चा व्यवसाय करण्याची इच्छा असते, पण व्यवसाय तेव्हाच यशस्वी होतो जेव्हा त्या व्यवसायाची कल्पना भन्नाट असेल, आजची गोष्ट आहे कुंदन मिश्रा या तरुणाची, ज्याचे वय फक्त २४ वर्षे असून तो आता महिन्याला लाखो कमवत आहे, तेही फक्त त्याच्या एका भन्नाट कल्पनेमुळे.

झारखंडच्या बोकारो गावात राहणाऱ्या या तरुणाचे नाव कुंदन मिश्रा असे आहे. कुंदन कस्टमाईज मर्चंडाईसचा व्यवसाय करत आहे, या व्यवसायातून त्याने फक्त ९ महिन्यात ५० लाखांची उलाढाल केली आहे. Custkart Merchandise नावाची कंपनी आहे, ही कंपनी कस्टमाईज मर्चंडाईस उपलब्ध करुन देते.

कुंदन हा इंजिनियरींग झालेला तरुण आहे. कॉलेजच्या तिसऱ्या वर्षी तो बऱ्याचदा मित्रांसोबत हॉस्टेलवर राहायचा. एकेदिवशी त्याने मित्रांसोबत एक वेब सिरिज पाहिली, तिथूनच त्याला स्वत:चा स्टार्टअप सुरु करण्याची प्रेरणा मिळाली.

२०१७ मध्ये कुंदने दोन मित्रांसोबत मिळून एका एग्रीगेटर कंपनीची सुरुवात केली. ही कंपनी युवकांना हेअरकट आणि बियर्ड ट्रिमबाबत टिप्स द्यायची. त्यासाठी त्यांनी ट्रायल रुम नावाचे मोबाईलमध्ये एक फिचर दिले होते, जेव्हा माणूस त्या कॅमेरा ऑन करायचा तर त्यामध्ये त्याच्या चेहऱ्याला सुट होईल असा हेअरकट सांगितला जायचा.

अशात त्या दोन मित्रांना कॉलेजमधून प्लेसमेंट मिळत होती, त्यामुळे त्या दोन्ही मित्रांनी मध्येच हा स्टार्टअप सोडला, त्यामुळे कुंदनलाही हा स्टार्टअप बंद करावा लागला. पण त्याला पुढे व्यवसाय करायचा आहे हे त्याने ठरवले होते.

२०१८ मध्ये जेव्हा त्याच्या कॉलेजमध्ये एक फेस्टिवल होता तेव्हा काही मुले त्याली भेटली आणि त्याने घातलेल्या प्रिंट केलेल्या टीशर्टबाबत विचारले कारण त्या मुलांना तो टिशर्ट खुप आवडला होता. त्याने विचार केला की हा व्यवसाय आपण केला तर…

कुंदनने तिथल्या लोकल वेंडर्सला विचारले आणि मुलांचे टीशर्ट प्रिंट केले. त्याने या टिशर्टमध्ये वेंडरकडून कमिशन घेतले. त्याने कॉलेजचे जवळपास ७०० टिशर्ट प्रिंट केले, या कामात त्याला तब्बल २५ हजारांचा फायदा झाला, विशेष म्हणजे त्याने एक रुपयासुद्धा गुंतवला नव्हता.

कुंदनने मिळालेले पैशातून हाच व्यवसाय सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्याने प्रिंटींगचा व्यवसाय करायचा हे ठरवले होते, त्यामुळे २०१९ मध्येच त्याने बोकारो एक भाड्याने ऑफिस घेतले आणि आपल्या कंपनीची सुरुवात केली.

कुंदनने सोशल मीडियावर पोस्ट टाकण्यास सुरुवात केली. त्याला सोशल मीडियावरुन चांगला प्रतिसाद मिळू लागला आणि त्यातून त्याला ऑर्डर्स मिळू लागले, आज त्याच्या संपर्कात ३० पेक्षा जास्त कॉलेज आहे. तसेच कुंदन आता टिशर्टसोबतच आयडी कार्ड आणि प्रिंटेट बॅगही तयार करुन देतो.
कुंदनने त्याच्या घराजवळच एक वर्कशॉप उघडली आहे, इथे त्यांनी मशीन आणल्या आहे. कुंदन लुधियाला आणि कोलकाताच्या वेंडर्सकडून फॅब्रिक मागवतो आणि ग्राहक सांगेन त्याप्रमाणे तो ऑर्डर तयार करतो.

कुंदनच्या या स्टार्टअपमध्ये दोनच लोक आहेत. एक म्हणजे कुंदन आणि दुसरा त्याचा भाऊ अभिषेक मिश्रा. कुंदन या व्यवसायातून लाखोंची उलाढाल करत आहे. तसेच त्याने १५ लोकांना रोजगारही दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.