पुण्यात ८ वीत शिकणाऱ्या सोनितची बालशौर्य पुरस्कासारासाठी निवड; कारण वाचून वाटेल कौतुक

0

 

शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पुण्यातल्या सोनित सिसोलेकरची प्रधानमंत्री बाल शौर्य पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

सोनित सध्या आठवीत शिकत असून तो पुण्याच्या पॅराडाईज इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये तो आहे. नासाच्या एका स्पर्धेत मंगळावरील माती लाल का झाली यांसंबंधी त्याने संशोधन सादर केले होते. तसेच इतर स्पर्धेतही त्याने उत्तम कामगिरी दाखवली.

त्याने राज्यस्तरीय पातळीवर, राष्ट्रीयस्तरीय पातळीवरच्या स्पर्धांमध्ये सुवर्णपदक मिळवले आहे. त्यामुळे त्याच्या विज्ञानातील या अतुलनीय कामगिरीमुळे त्याला प्रधानमंत्री राष्ट्रीय बालशौर्य पुरस्कार देण्यात येणार आहे.

सोनितला लहानपणापासूनच दगडांची रचना, खडकांचे विविध प्रकार, पुण्यात असणाऱ्या टेकड्या मातीचे प्रकार आणि त्यांचे रंग या सर्वांची आवड होती. त्याची आवड पाहून त्यांच्या पालकांनीही त्याला पाठिंबा दिला.

त्याने आतापर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे संशोधन केले आहे. त्यामध्ये त्याने इंडियन नॅशनल सायन्स अँड इंजिनियरिंग फेयरमध्ये त्याने झाडांच्या वाढीबाबत आवाजाचा काय परिणाम होतो, यावर संशोधन केले होते. त्याला या संशोधनासाठी राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर सुवर्णपदक आणि रौप्यपदक मिळाले होते.

लहानपणी तो आपल्या बाबंसोबत पुण्यातील टेकड्यांवर फिरायला जायचा. तेव्हा तो तिथल्या मातीचे आणि दगडांचे निरीक्षण करायचा. त्याला जर खेळणी आणून दिली, तर ती मोडून तो त्यात काय आहे हे बघायचा.

सोनितने आपल्या घरीच एक प्रयोगशाळा तयार केली आहे. त्याने झाडांबाबतचे संशोधन आपल्या घरीच केले होते. तसेच काही संशोधन त्याने गुफेत जाऊन केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.