राज ठाकरेंचा अत्यंत विश्वासू ते भाजपचा विरोधी पक्षनेता, वाचा प्रवीण दरेकरांची राजकीय कारकीर्द

0

 

राज्यात आता सत्ताधारी पक्षावर वेगवेगळ्या मुद्यांवरुन विरोधी पक्षातील नेत्यांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहे. यात विरोधी पक्षातील एक प्रमुख नाव म्हणजे प्रवीण दरेकर. प्रवीण दरेकर हे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आहे.

सध्या मुंबई घोटाळा प्रकरणावरुन भाजप नेते प्रवीण दरेकर पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. प्रवीण दरेकर यांना आक्रमक आणि अभ्यासु नेते म्हणून ओळखले जाते. त्यांची राजकारणातील कारकिर्दीची सुरुवात एक विद्यार्थी नेता म्हणून झाली होती, पण आता ते विरोधी पक्षनेता झाले आहे. त्यांचा विधान परिषदेपर्यंतचा खुप अडचणींचा होता, चला तर मग जाणून घेऊया..

प्रवीण दरेकर यांचा जन्म रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील वसाप गावातला आहे. त्यांचे वडिल हे एक बस कंडक्टर होते. पण अचानक त्यांच्या वडिलांची नोकरी सुटली आणि त्यांची आर्थिक परिस्थिती बिघडली.

परिस्थिती गरीबीची असल्याने त्यांना शाळेत जात असताना रोज पाच किलोमीटर पायी चालायचे. त्यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण पोलादपुरलाच झाले होते. त्यानंतर ते पुढच्या शिक्षणासाठी मुंबईला आले.

१९८९ मध्ये त्यांनी मुंबईच्या विद्यापीठातून कॉमर्स विषयातून पदवीचे शिक्षण घेतले. त्यावेळीच ते राजकारणात ओढल्या गेले होते, शिवसेनेकडे त्यांचे आकर्षण होते, त्यामुळे त्यांनी राज ठाकरेंच्या नेतृत्वाखाली भारतीय विद्यार्थी सेनेतून आपल्या कामास सुरुवात केली होती. तिथूनच त्यांना राज ठाकरेचे विश्वासू म्हणून ओळख निर्माण झाली होती.

१९९७ मध्ये पहिल्यांदा त्यांना शिवसेनेकडून पालिकेच्या निवडणूकीचे तिकिट मिळाले. तिकिट मिळाले होते. त्यासाठी ते मातोश्रीवर आभार मानायला गेले पण घरी येईपर्यंत त्यांचे तिकिट कापल्या गेले होते. त्यांचे हे तिकिट गटबाजीमुळे कापले गेले होते. तिथुनच त्यांची शिवसेनेवरिल नाराजी सुरु झाली.

२००६ मध्ये जेव्हा शिवसेना सोडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली, तेव्हा सुद्धा प्रवीण दरेकरांनी राज ठाकरेंना साथ दिली. तिथूनच त्यांना राजकारणात ओळख मिळायला सुरुवात झाली. पुढे ते आक्रमक नेते ओळख म्हणून ओळखले जाऊ लागले.

२००९ मध्ये जेव्हा निवडणूक झाली तेव्हा ते पहिल्यांदा आमदार झाले, २००९ ते २०१४ पर्यंत दरेकर मनसेचे आमदार होते. पण २०१४ साली मोदी लाट आली. तेव्हा २०१४ च्या निवडणूकीत दरेकरसोबत अनेक नेते पराभूत झाले.

तेव्हा मनसेला गळती लागली आणि २०१५ मध्ये दरेकरांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला. २०१६ मध्ये त्यांना विधान परिषदेची आमदारकी मिळाली. अशात ते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खास मित्र झाले. त्यामुळे लवकरच ते विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणून घोषित झाले.

Leave A Reply

Your email address will not be published.