मोदी नाही तर हा मराठी माणूस झाला असता देशाचा पंतप्रधान, पण नियतीने केला घात

0

 

 

सध्या देशातच नाही तर पुर्ण जगभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव एका वेगळ्याच उंचीवर पोहचले आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणूकीत मोदी लाट आली नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले.

नरेंद्र मोदी आज देशाचे पंतप्रधान आहे, पण तुम्हाला माहितीये का जर आज एक मराठी नेता जर या जगात असता, तर तो मोदींऐवजी पंतप्रधान झालेला असता. हा मराठी नेता म्हणजे प्रमोद महाजन.

प्रमोद महाजन यांनी भाजपसाठी खुप संघर्ष केला होता, त्यांना अटलबिहारी वाजपेयी यांचा हनुमान, शिवसेना-भाजपच्या गठबंधनाचे सुत्रधार, बीजेपीचा चाणक्य अशा अनेक उपाध्या प्रमोद महाजनांना देण्यात आल्या होत्या. आज जर ते जीवंत असते, तर देशाचे राजकारण काही वेगळेच असते. पण त्यांचा अकाली मृत्युमुळे सर्वच राजकारण बदलले.

प्रमोद महाजन यांचा जन्म ३ ऑक्टोबर १९४९ मध्ये मराठवाड्यात झाला होता. महाजन त्यांच्या कुटुंबासोबत उस्मानाबादच्या एका भाड्याच्या घरात राहत होते. पुढे ते अंबाजोगाई इते राहण्यात गेले, प्रमोद महाजनांचे बालपण तिथेच गेले. प्रोद महाजन २१ वर्षांचे असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते.

प्रमोद महाजनांनी योगेश्वारी महाविद्यालयातून शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी रानडे इन्स्टिट्युटमधून पत्रकारितेचे शिक्षण घेतले. त्यानंतर १९७२ मध्ये त्यांनी रेखा हमीने यांच्याशी विवाह केला होता.

महाजनांना सुरुवातीला पत्रकारीतेत नोकरी मिळत नसल्याने त्यांनी शिक्षक म्हणून काम सुरु केले. ते खोलेश्वर कॉलेजमध्ये इंग्रजी विषय शिकवायचे. तसेच त्यांना राजकारणातही रस होता, राजकीय चर्चांमध्ये त्यांचा हात कोणी धरत नव्हते.

प्रमोद महाजन हे लहानपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडले गेलेले होते. १९७० मध्ये त्यांनी तरुण भारत दैनिकात काम करण्यास सरुवात केली. आणीबाणीच्या काळात त्यांच्या राजकारणाची सुरुवात झाली होती, पुढे त्यांच्या कामामुळे त्यांना संघाने प्रचारक केले होते.

प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांची मैत्री खुप घट्ट होती. राजकारणात प्रमोद महाजन वाजपेयी यांना खुप मानत होते. त्यांना सुरुवातीला भाजपचा युवा मोर्चाचा कार्यकर्ता म्हणून काम केले, पुढे ते महाजन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले.

१९९६ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणूकीत पुर्व मुंबई मतदार संघातून प्रमोद महाजन झाले. केंद्रात जेव्हा भाजपची सत्ता आली, तेव्हा त्यांना केंद्रीयमंत्री बनवण्यात आले. पण ते सरकार १३ दिवसातच कोसळले. १९९७ च्या फेरनिवडणूकीत मात्र त्यांना पुन्हा पराभावाला सामोरे जावे लागले होते.

पुढे जेव्हा पुन्हा एकदा भाजप सत्तेत आली तेव्हा प्रमोद महाजनांना राज्यसभेत त्यांची निवड झाली. त्यानंतर त्यांनी अनेक मंत्रिपदांचे काम केले. वाजपेयीनंतर लालकृष्ण अडवाणी की प्रमोद महाजन ही नावे समोर यायची. नावातच पीएम असणारे प्रमोद महाजन पुढे जाऊन नक्कीच पंतप्रधान बनतील अशी आशा होती, पण ३ मे २००६ ला त्यांचे अकाली निधन झाले.

Leave A Reply

Your email address will not be published.