३०० रुपयांवर काम करणारे प्रकाश राज कसे झाले सुपरस्टार?, वाचा त्यांचा संघर्षमय प्रवास

0

 

प्रकाश राज हे भारतीय चित्रपट सृष्टीतले एक दमदार अभिनेते म्हणून ओळखले जातात. आज त्यांच्याकडे प्रसिद्धि आहे पैसा आहे, पण त्यासाठी आधी त्यांनी खुप कष्ट घेतले आहे, प्रकाश राज हे आधी रंगभुमीवर सफाई कर्मचारीचे केले होते, पण आता ते सुपरस्टार बनले आहे, चला तर मग जाणून घेऊया त्यांच्या आज पर्यंतचा प्रवास…

२६ मार्च १९६५ मध्ये बंगळूर येथे प्रकाश राज यांचा जन्म झाला होता. प्रकाश यांना लहानपणापासून अभिनयाची आवड होती. त्यामुळेच त्यांची पावले थिएटरचे दिशेने वळत गेली. अभिनयात संधी मिळत नसल्यामुळे त्यांनी थिएटरमध्ये अनेक कामे केली.

प्रकाश राज हे थिएटरची साफ-सफाई करायचे, तिथे असणाऱ्या कलाकारांच्या चहा पाण्याची व्यवस्था करायचे. तसेच स्टेजवर सेट तयार करणे, ही सगळी कामे प्रकाश राज करायचे, त्यासाठी त्यांना महिन्याला ३०० रुपये मिळायचे.

हे काम फक्त ते यामुळे करायचे कारण तिथे जर एखादा कलाकार उपस्थित नसेल तर त्यांना एखाद्या नाटकात भुमिका मिभावता यायची. पण त्यानंतर त्यांचे नशीबच पलटले, त्यांच्या अभिनयाला चांगला प्रतिसाद मिळू लागला आणि त्यांना नाटकात वेगवेगळ्या भुमिका मिळू लागल्या.

प्रकाश राज यांनी पुढे २५० पेक्षा जास्त नाटकं केली. त्यांचे काम पाहून त्यांना एका मालिकेत एक पात्र साकारण्याची संधी मिळाली, ती मालिका म्हणजे बिसिलू कुदुरे.

प्रकाश राज यांची ही मालिका प्रचंड गाजली आणि तिथून त्यांनी कधीच मागे वळून नाही बघितले. मालिकेत त्यांच्या भुमिका प्रचंड गाजल्यामुळे त्यांना लवकरच चित्रपटात संधी मिळाली. त्यांनी अनेक तेलूगू, मल्याळम कन्नड चित्रपटांत काम केले आहे, तसेच हिंदी चित्रपटातील त्यांची सिंघममधली खलनायकाची भुमिका प्रचंड गाजली होती.

प्रकाश राज यांनी आतापर्यंत सर्व प्रकारच्या भुमिका निभावल्या आहे. २००९ मध्ये त्यांचा चित्रपट कांचीपुरमसाठी प्रकाश राज यांना सर्वोत्कृष्ठ अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. प्रकाश राज यांची एक अष्टपैलू अभिमेता म्हणून सुद्धा ओळखले जाते. एकेकाळी सफाई कर्मचाऱ्याचे काम करणारे प्रकाश राज आज करोडोंच्या संपत्तीचे मालक आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.