पैसै नव्हते म्हणून पुस्तके उधार घेऊन रोज १८ तास केला अभ्यास, आज झाला मोठा अधिकारी

0

सिविल सेवेत जाण्यासाठी अनेक मुले तयारी करत असतात. युपीएससी परिक्षा पास करण्यासाठी खुप मेहनत घ्यावी लागते. अधिकारी बनण्याचे स्वप्न खुप लोक पाहतात पण हे स्वप्न पुर्ण करणे सगळ्यांना जमत नाही.

आज आम्ही तुम्हाला अशा व्यक्तीबद्दल सांगणार आहोत ज्याने उधार पुस्तके घेऊन अभ्यास केला आणि युपीएससीची परिक्षा पास केली. त्या व्यक्तीचे नाव आहे नीरीश. तो आधी पेपर टाकण्याचे काम करत असे.

त्याने एका मुलाखतीत अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. त्यांनी सांगितले एक काळ असा होता की, त्यांच्याकडे शिक्षणासाठी पैसेही नव्हते. त्यामुळे ते रोज पेपर टाकण्याचे काम करायचे. नीरीश राजपुत यांनी सांगितले की त्यांचे वडिल शिवणकाम करायचे.

निरिश त्यांना कामात मदत करायचे. परिस्थिती बिकट असतानाही त्यांनी हार मानली नाही. नीरीश कुमार मध्यप्रदेशमधील भिंड जिल्ह्यातील रहिवासी आहेत. १५ बाय ४० फूटाच्या घरात ते आपल्या ३ भाऊ आणि बहिणींसोबत राहायचे.

लहानपणापासूनच ते अभ्यासात खुप हुशार होते. नीरीश यांचे शिक्षण सरकारी शाळेत झाले होते. त्यांना चांगल्या शाळेत शिक्षण घ्यायचे होते पण त्यांच्या घरची परिस्थिती बिकट होती. त्यामुळे त्यांना शाळेची फी भरण्यासाठी अनेक संकटांचा सामना करावा लागत होता.

त्यामुळे त्यांनी पेपर टाकण्यास सुरूवात केली. तसेच ते आपल्या वडिलांना शिलाईच्या कामात मदतसुद्धा करायचे. नीरीश यांनी १० वीमध्ये ७२ टक्के गुण मिळवले. त्यानंतर पुढील शिक्षण घेण्यासाठी ते ग्वालियर येथे गेले होते.

शिक्षण घेत असताना त्यांनी तिथे पार्ट टाईम नोकरीसुद्धा केली होती. त्यांना त्यांच्या मित्राने धोखा दिला आणि नोकरीवरून काढून टाकले होते. मग नीरीश दिल्लीमध्ये आले आणि तिथे त्यांचा एक मित्र आयएएस परिक्षेची तयारी करत होता.

नीरीश त्याच्यासोबत आयएएसच्या तयारीला सुरूवात केली. ते दिवसाला १८ तास अभ्यास करत असत. नोकरी सुटल्यानंतर त्यांच्याकडे पुस्तके घेण्यासाठी पैसे नव्हते त्यामुळे त्यांनी मित्रांकडून पुस्तके उधार घेऊन अभ्यास केला.

त्यांनी कसलाही क्लास लावला नव्हता. शेवटी त्यांची मेहनत फळाला आली आणि २०१३ मध्ये आयएएसची परिक्षा पास केली. त्यांची देशात ३७० वा नंबर आला होता. आता सध्या ते देशाची सेवा करण्याच्या कामात व्यस्त आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.