आयटीची नोकरी सोडून पुण्यातील तरुणीने प्रदूषण रोखण्यासाठी घेतला पुढाकार…

0

 

वाढते प्रदुषण हि सगळ्यांसाठीच गंभीर समस्या बनली आहे. हवा प्रदुषणामुळे तर काही ठिकाणी श्वास घेण्यात पण अडचणी येत आहे. या वाढत्या प्रदुषणाला रोखण्यासाठी अनेक लोक आता पुढे येताना दिसून येत आहे.

पर्यावरण वाचवण्यासाठी काही लोक झाडे लावताना दिसून येत आहे, तर काही लोक नद्या, समुद्र काठ स्वच्छ करताना दिसून येत आहे. आता या लोकांच्या यादीत एका पुणेकर तरुणीचे नाव पुढे आले आहे.

पुण्यातल्या या तरुणीचे नाव पुजा बदामीकर असे आहे. पुजाने प्रदुषण रोखण्यासाठी भन्नाट आयडिया लावली आहे. खराब झालेले टायर जाळून वायु प्रदुषण होण्यापेक्षा त्यांच्या चप्पल आणि बुट तयार करण्याचे काम तरुणीने सुरु केले आहे.

दरवर्षी जगभरात जवळपास १ बिलीयन जुने टायर कचऱ्यात टाकले जातात. त्यांचे करायचे काय म्हणून त्यांना पेटवून दिले जाते. त्याच्या विषारी वायुमुळे ध्वनी प्रदुषण होते. त्यामुळे यावर उपाय म्हणून पुजाने नेमितल नावाचे स्टार्टअप सुरु केले.

जुन्या टायरचा उपयोग करुन तिने चप्पल, शुज तयार केले आहे. पुजाने इलेक्ट्रोनिक्स आणि कम्युनिकेशन्समध्ये इंजिनियरींग पुर्ण केले आहे. तिने पुण्यात आयटी कंपनीत चारवर्षे नोकरीही केली आहे.

आपल्याकडे जुने टायर पेटवले जातात, पण ते एक समस्या संपवून दुसरी समस्या उभी करण्यासारखे आहे. त्यामुळे खराब झालेल्या टायरपासून तिने चप्पला आणि बुट तयार करण्याचे ठरवले आणि स्थानिक कारागीरांना घेऊन तिने या व्यवसायाला सुरुवात केली आहे.

चप्पल बुट आपण नेहमीच प्लास्टिक आणि लेदरपासून बनवताना बघतो. पुजाने चप्पलांचे सोल तयार करण्यासाठी टायरचा वापर केला आहे, तर चप्पलांच्या पट्ट्यासाठी लेदर आणि फॅब्रिकचा वापर केला आहे.

पुजाने एप्रिल २०१९ मध्ये नेमितल नावाची वेबसाईट सुरु केली आहे. या वेबसाईटमुळेच पुर्ण देशभरात तिने तयार केलेल्या चप्पला, बुटांची विक्री होत आहे. पुजाच्या या भन्नाट आयडियामुळे राज्यभरात तिचे कौतूक केले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.