आईने मुरमुरे विकून कष्टाने शिकवले, मुलींनी जिद्द दाखवत सर केले यशाचे शिखर

0

 

आजकाल मुलीसुद्धा मुलांच्या खांद्याला खांदा लावून चालत आहे. प्रत्येक क्षेत्रात आता मुलीही काम करताना दिसून येत आहे. पण अशातही काही ठिकाणी मुलींना मुलांपेक्षा कमी समजून नाकारले जाते. अशात जर त्यांना एक संधी मिळाली तर मुली काहीही करु शकतात, हे आता पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

शिराळी तालुक्यातील वाकुर्डे बुद्रुक पण सध्या लाडवाडी येथे राहणाऱ्या या दोन मुलींचे नाव पुजा आणि रोहिणी आहे. मुली आहेत म्हणून बापाने नाकारलेल्या या मुली आता अनेकांसाठी प्रेरणादायी बनल्या आहे.

वडिलांनी नाकारल्यानंतर आईने मुलींना सांभाळले आहे. तसेच आईने सांभाळून मोठ्या कष्टाने त्यांना वाढवल्याने त्या पोरींनीही आईच्या कष्टाचे चीज केले आहे. या दोन्ही बहिणी आता देश सेवेसाठी सज्ज झाल्या आहेत.

दोन्ही बहिणींच्या वडिलांना मुलगा हवा होता. पण नशीबाने त्यांना एकापाठोपाठ रोहिणी आणि पुजा अशा दोन मुली दिल्या. त्यामुळे त्यांच्या संसारात वाद निर्माण व्हायला सुरुवात झाली. त्यामुळे सततच्या त्रासाला कंटाळून आईने मामाचे गाव गाठले आणि तिथे त्या आपल्या मुलींसोबत राहू लागल्या.

मुलींचा आणि आपला मामांना भार नके म्हणून त्यांनी चणे, फुटाणे आणि मुरमुरे विकण्याचे काम सुरु केले. त्यातुन मिळालेल्या पैशांमधून त्या दोन्ही मुलींना शिक्षण देऊ लागल्या. मुलीही शिक्षणात हुशार होत्या, तसेच त्यांना आपल्या परिस्थितीची जाणीव पण होती. त्यामुळे त्यांनी जिद्दीने आर्मी भरती होण्याची तयारी सुरु केली.

पुजा आणि रोहिणीने गावच्या माळाला प्रशिक्षण केंद्र केले आणि तिथेच त्यांनी सराव करण्यास सुरुवात केली. त्यांनी मेहनत घेऊन प्रयत्न केले होते, तसेच त्यांचे प्रयत्न प्रामाणिक असल्याने पहिल्या प्रयत्नातच दोघींनाही यश मिळाले आहे.

पुजाची बी.एस. एफमध्ये तर रोहिणीची असाम रायफल्समध्ये निवड झाली आहे. विशेष म्हणजे कोणत्याही खाजगी शिकवणीतून प्रशिक्षण न घेता त्यांनी स्वबळावर हे यश मिळवले आहे. त्यामुळे या मुलींचे राज्यभरात कौतूक केले जात असून त्या आता अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.