खाकीतला देव! महिला पोलिस उपनिरीक्षकाने स्वतःच्या खांद्यावर मृतदेह उचलून २ किलोमीटरपर्यंत चालत नेला

0

 

 

आपल्या जवळपास अनेकदा अशा घटना घडत असतात जेव्हा आपल्याला खाकीमधला दिसून येतो. अनेकदा सख्खे नातेवाईक मदतीला धावून येत नाही, अशावेळी पोलीस मदतीला धावून येत असतात. आता अशीच घटना घडली आंध्र प्रदेशमध्ये घडली आहे.

एका महिला पोलीस उपनिरीक्षकाने ८० वर्षीय वृद्ध व्यक्तीचा मृतदेह दोन किलोमीटरपर्यंत वाहून नेला आहे. ही घटना श्रीकाकुलम जिल्ह्याच्या आदिवि कोत्तूतू गावात घडली आहे. ज्या महिला उपनिरीक्षकाने मृतदेह वाहून नेला त्यांचे नाव सिरिशा असे आहे.

त्या गावात असणाऱ्या शेतात ८० वर्षाच्या असणाऱ्या एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. ही गोष्ट कळताच कासीबुगग्याच्या उपनिरीक्षक सिरिशा कॉन्स्टेबलसह घटनास्थळी पोहचल्या.

शेतात असलेला मृतदेह बाहेर काढायचा होता, पण त्यासाठी कोणतेही वाहन आणता येईल असा मार्ग नव्हता. त्यामुळे सिरिशा यांनी तिथे असलेल्या गावातल्या लोकांची मदत मागितली पण कोणीही मदत करण्यासाठी पुढे आले नाही.

सिरिशा यांनी मदत मागून सुद्धा गावकरी मदतीसाठी पुढे आले नाही, ते पाहून सिरिशा यांनी स्वतःच त्या मृतदेहाला शेताच्या बाहेर वाहून नेण्याचा निर्णय घेतला.

सिरिशाने ललिता ट्रस्टच्या सदस्यांच्या मदतीने त्या व्यक्तीचा मृतदेह स्ट्रेचरवर ठेवला आणि स्वतःच्या खांद्यावर तो मृतदेह ठेऊन शेताच्या बाहेर नेला. मृतदेहाला बाहेर नेण्यासाठी सुमारे २५ मिनिटे लागली होती. सिरिशा यांच्या याकामाचे सर्वत्रच कौतुक होत आहे.

 

गावकरीही नाही आले मदतीला तेव्हा खंबीरपणे उभी राहिली हि महिला पोलिस उपनिरीक्षक
https://tumchigosht.com/?p=1013&preview=true
Leave A Reply

Your email address will not be published.