५ एकरची शेती झाली आता ८७ एकरची, बटाट्याची शेती करून कमावतोय वर्षाला ३.३ कोटी

0

आपल्या शेतकऱ्यांची सध्या काय स्थिती आहे हे सगळ्यांना माहित आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या मागण्या पुर्ण करण्यासाठी अनेकदा रस्त्यावर उतरावे लागते. त्यामध्ये असेही काही शेतकरी आहेत जे वेगवेगळे प्रयोग करून खुप पैसा कमावतात.

आज आम्ही तुम्हाला अशाच एका पोलिस शेतकऱ्याबद्दल सांगणार आहोत. हा शेतकरी पहिल्यांदा पोलिस होता. पोलिसमधून निवृत्त झाल्यानंतर त्यांच्या मनात शेती करण्याचा विचार आला. पण शेतात लावायचे काय हे त्यांना कळत नव्हते. मग त्यांनी शेतात बटाटे लावण्याचा निर्णय घेतला.

पण त्यांना शेतीतून वर्षाला ३.३ कोटींची कमाई होते कसकाय हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. गुजरातमध्ये एक छोटे गाव आहे त्याचे नाव आहे डांगिया. त्या गावातील रहिवासी आहेत पार्थिभाई जेठाभाई चौधरी.

आज देशातील सर्वात मोठ्या बटाटा उत्पाकांपैकी ते आहेत. माजी डीएसपी असलेले पार्थीभाई यांनी बटाटा उत्पादनात जागतिक विक्रम नोंदविला आहे. वन इंडियाने या संदर्भात वृत्त दिले आहे. पार्थीभाईंनी पोलिस विभागात एसआय म्हणून सुरूवात केली होती आणि २०१५ मध्ये ते निवृत्त झाले. त्यांना ४ भाऊ आहेत.

त्याचें वडिलही शेतकरी होते. भावांमध्ये जमिनीच्या वाटण्या झाल्या आणि त्यांनी शेती करण्याचा निर्णय घेतला. शेती करण्यासाठी त्यांनी इतर शेतकऱ्यांची भेट घेतली. त्यांच्या शेती करण्याच्या पद्धती त्यांनी जाणून घेतल्या.

अखेर त्यांनी बटाट्याची लागवड करण्याचा निर्णय घेतला. २००४ मध्ये त्यांनी शेती करण्यास सुरूवात केली. सुरूवातील त्यांची शेती ५ एकरावर मर्यादित होती. काही कालावधीनंतर त्यांची शेती ८७ एकरांवर पोहोचली. तंत्रज्ञानामध्ये त्यांना बरेच ज्ञान मिळाले आहे.

आता त्यांच्याकडून लोक नवनवीन पद्धती शिकण्यासाठी येत असतात. बऱ्याच मोठ्या कंपन्या त्यांच्याकडून बटाटे खरेदी करतात. त्यामध्ये मॅकेन फूड्स, इंडिया युनिट, हायफन फूड युनिट आणि बालाजी वेफर्स यांचा समावेश आहे.

या बटाट्यांचा वापर चिप्स बनविण्यासाठी आणि इतर गोष्टी बनविण्यासाठी केला जातो. त्यांना सगळ्या किटकनाशकांचे ज्ञान आहे. आता सध्याला ते प्रतिएकर १५ ते १८ टन बटाटे पिकवतात. त्यांचे बटाटे २२ रूपये प्रति किलो या दराने विकला जातो.

त्यांचे वार्षिक उत्पादन १५ लाख किलो आहे. यातून ते वर्षाला २.७० कोटी रूपये कमावतात. त्यांची वार्षिक उलाढाल ३.३ कोटी रूपये आहे. शेतीसाठी त्यांना ५० ते ६० लाख रूपये खर्च येतो. सध्या त्यांची ख्याती पुर्ण देशात पसरली आहे आणि पुर्ण देशातून लोक त्यांच्याकडे शेतीचे प्रक्षिक्षण घेण्यासाठी येत असतात.

Leave A Reply

Your email address will not be published.