नाद खुळा! केळीच्या सालट्यांपासून करोडो रुपये कमवतोय हा माणूस

0

 

 

तुम्ही अनेकदा काही लोकांना टाकाऊ वस्तुंपासून एखादी टिकाऊ वस्तु बनवताना पाहिले असेल, पण तुम्ही कधी एखाद्याला टाकाऊ वस्तुंपासून करोडो रुपये कमवताना पाहिले आहे का? चला तर मग आज जाणून घेऊया अशाच एका माणसाची गोष्ट जो केळीच्या सालट्यांमधून करोडो रुपयांची कमाई करत आहे.

तामिळनाडूच्या मदुरैच्या मेलाक्कम गावात राहणाऱ्या या माणसाचे नाव पीएम मुरुगेसन आहे. त्यांनी ८ वीत असतानाच शाळा सोडली पण त्यांच्या भन्नाट कल्पनेमुळे ते केळीच्या सालट्यापासून करोडो रुपयांची कमाई करत आहे. त्यामुळे त्यांनी सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

केळांच्या सालट्यांपासून बॅग, टोपली बनवून ते फक्त आत्मनिर्भरच नाही बनले तर त्यांनी अनेक लोकांना रोजगार उपलब्ध करुन दिला आहे. मुरुगेसन यांनी एक खास मशीन तयार केली, असून त्या मशीनने केळ्यांच्या सालट्यांवर प्रक्रिया करुन त्याची दोरी बनवली जाते.

मुरुगेसन यांचे शिक्षण फक्त ८ वी पर्यंत झाले आहे, पण काही कुटुंबीक अडचणींमुळे त्यांना शिक्षण सोडावे लागले. असे असुनही त्यांनी ही मशीन तयार केली आहे, त्यामुळे सध्या सगळीकडेच त्यांची चर्चा होत आहे.

मुरुगेसन यांचा जन्म एका गरीब कुटुंबातच झाला होता. परिस्थितुळे त्यांना जेवढे शिक्षण घेणे शक्य होते, तेवढे शिक्षण त्यांनी घेतले. कारण पुढेचे शिक्षण घेण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते.

त्यामुळे लहानपणीच त्यांनी आपल्या वडिलांसोबत काम शेतीत काम करण्यास सुरुवात केली. त्यांनी शेतीत वेगवेगळे प्रयोग केले पण त्यातुन त्यांना फायदा झाला नाही, त्यामुळे त्यांनी केळीच्या सालट्यांचा उपयोग करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा काही लोक सालट्यांचा उपयोग फुलांचा हार बनवताना धागा बनवण्यासाठी करायचे, पण सालट्यांचा उपयोग करुन काहीतरी वेगळे केले पाहिजे असे मुरुगेसन यांच्या डोक्यात होते.

२०१७ मध्ये मुरुगेसन यांनी खुप कष्टाने सायकिचलचे पँडल, रिम्स आणि पुलीचा उपयोग करुन ही मशीन तयार केली. तसेच त्यांनी जैव प्रौद्योगिकी उद्योग अनुसंधान सहायता परिषदशी संपर्क केला आणि अधिकाऱ्यांना ही मशीन पाहण्यासाठी बोलावले. ही मशीन त्या अधिकाऱ्यांना खुप आवडली.

अधिकाऱ्यांनी केलेल्या कौतुकामुळे त्यांनी आणखी दिड लाख रुपये गुंतवले आणि मशीन अजून चांगली बनवली. मुरुगेसन यांनी या व्यवसायातून ३०० लोकांना रोजगार दिला आहे.

मुरुगेसन यांची या व्यवसायातून वर्षाला तब्बल १.५ कोटींची उलाढाल करत आहे. मुरुगेसन यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानितही करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.