आता प्लास्टिकपण कुजणार; साताऱ्याच्या तरुणांचा भन्नाट प्रयोग; वाचा सविस्तर

0

 

 

प्लास्टिक लवकर कुजत नसल्याने प्लास्टिकच्या वापराचे हे वाढते प्रमाण पर्यावरणासाठी घातक ठरत आहे, त्यामुळे अनेक लोक यावर उपाय शोधत आहे.

आता साताऱ्याच्या तरुणांनी एक भन्नाट प्रयपग करून कुजणारे प्लास्टिक तयार केले आहे. प्लास्टिकच्या समस्येवर उपाय सातारकरांनी  स्टार्टअपच्या माध्यमातून संशोधन करून कुजणारे  प्लास्टिक तयार केले आहे. तसेच आयात कराव्या लागणाऱ्या या  मटेरियलची निर्मिती करणे आता भारतातच शक्य होणार आहे.

प्लास्टिकच्या विघटनावर नेहमीच प्रश्न उपस्थित केले जातात. तसेच त्यावर उपाय देखील शोषले जात आहे. अशात उपाय म्हणून बायोडीग्रेडेबल प्लास्टिक म्हणजेच कुजणाऱ्या प्लस्टिकच्या मटेरियलची निर्मिती करण्यात आली आहे. पण सध्या ते मटेरियल परदेशातून आयात करावे लागत आहे.

तसेच हे मटेरियल परदेशातून आयात करावे लागत असल्याने त्याला खर्चही भरपूर येत आहे. अशात समस्यांवर उपाय शोधणाऱ्या नवीन स्टार्टअपच्या निर्मीतीसाठी शासनाकडून प्रोत्साहन मिळते.

त्याचा लाभ घेत आता करण चव्हाण, इंद्रजित निकम, तेजस झगडे यांनी आता असे गुणवत्तापूर्ण मटेरियल तयार केले आहे. त्यामुळे आता परदेशातून हे मटेरियल आयात करण्याची गरज पडणार नसून आता हे मटेरीयल भारतातच तयार करता येणार आहे.

ता तिघांनी शासनाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाकडे विघटनशील प्लास्टिकच्या निर्मितीसाठी स्टार्टअपच्या अर्ज केला होता. त्यामधून त्यांना ५३ लाख रुपयांचे अनुदान मिळाले होते.

त्यातून तिघांनी बायोडीग्रेडेबल प्लस्टिकची गुणवत्ता वाढवून त्याची किंमत अजून कमी करणे, तसेच त्यातून वेगवेगळ्या प्रकारचे शाश्वत उत्पादन तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामध्ये त्यांना यश आले असून त्यांनी कुजणाऱ्या प्लॅस्टिकच्या पिशव्या तयार केल्या आहे.

या तरुणांनी हे संशोधन इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल्स इंजिनिअरिंग ऍण्ड टेक्नॉलॉजी अहमदाबाद व लॅबोरेटरी फॉर ऍडव्हान्स पॉलिमेरिक मटेरियल भुवनेश्वर येथे केले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.