एकेकाळी पिझ्झा विकणारा हा माणूस केक विकून कसा बनला करोडोंच्या कंपनीचा मालक

0

माणसाच्या आयुष्यात एकवेळ येते की त्याला वाटते आता सगळं संपलं, पण तीच वेळ काहीतरी सुरू करण्याची असते. अशा वेळेत तेच माणसं संकटाचा सामना करू शकतात ज्यांच्यात जिद्द असते. आज जाणून घेणार आहोत अशाच एका माणसाची गोष्ट ज्याच्या संघर्षाने त्याला पिझ्झा विकणाऱ्यापासून करोडोंची उलाढाल करणाऱ्या कंपनीचा मालक बनवले.

ही गोष्ट आहे दिल्लीमधल्या सुनील वशिष्ठची. एकेकाळी कुरियर बॉय आणि पिझ्झा डिलिव्हरी बॉय म्हणून काम करणारे सुनील आज कोट्यवधी रुपयांचा कंपनीचे मालक आहे. तसेच आपल्या कंपनीच्या माध्यमातून अनेक तरुणांना आणि महिलांना रोजगार देणाचे काम पण सुनील करत आहे.

सुनील यांचा जन्म एका मध्यम वर्गीय कुटुंबात झाला होता. १० वी पर्यंतचे शिक्षण त्यांनी घेतले. कुटुंबाची परिस्थिती चांगली नसल्याने पुढे शिक्षण घेण्यासाठी पैसे नव्हते, त्यामुळे त्यांनी शिक्षणासोबतच काम करण्यास सुरुवात केली.

सुनील यांनी कुरियर बॉयचे काम सुरू केले, तेव्हा २००-३०० रोज त्यांना मिळायचे. १९९८ मध्ये त्यांनी पिझ्झा डिलिव्हरी बॉयचे काम सुरू केले. त्यांच्या कामांमुळे त्यांना चांगला पगार मिळत होता. पण त्यांना ती नोकरी सोडावी लागली.

सुनील यांना दुसरी नोकरी शोधायची होती पण नोकरी करण्याची त्यांची इच्छा नव्हती. त्यामुळे त्यांनी एक छोटे हॉटेल टाकले, पण खूप मेहनत घेऊन पण त्यांचे हे हॉटेल नाही चालले. त्यामुळे त्यांनी ६० हजार रुपयांच्या गुंतवणूक करून एक ‘फ्लाईंग केक’ नावाने दुकान सुरू केले.

आपल्या केकच्या गुणवत्तेवर त्यांना ग्राहक मिळत गेले. त्यामुळे त्यांनी केक डिलिव्हरीचे काम पण सुरू केले. केकची गुणवत्ता आणि वेळेत डिलिव्हरी आणि कमी किंमत या गोष्टींमुळे त्यांनी स्वतःचा एक ब्रँड तयार केला.

सुनील यांना जवळच्या कंपन्यांच्या ऑर्डर मिळायला लागल्या आणि लवकरच त्यांचा या व्यवसायावर हातखंडा बसला. त्यामुळे त्यांनी बंगलोर, पुणे, नोएडा, बिहार अशा ठिकाणी आपल्या केकच्या शॉप्स टाकल्या.

कोरोना काळात त्यांच्या व्यवसायात त्यांना नुकसान होत होते, कंपन्यांच्या ऑर्डर्स मिळत नव्हत्या त्यामुळे त्यांनी पिझ्झा, बर्गर सारख्या फास्टफूडच्या नवीन ब्रँच खोलल्या आहेत. ज्या ठिकाणी फास्टफूडची मागणी मोठ्याप्रमाणात आहे, त्याच ठिकाणी या ब्रँच खोलण्यात आलेल्या आहे. त्यामुळे सुनील यांना आपल्या व्यवसायात चांगलाच फायदा होत आहे.

कोरोनाकाळात अनेक लोक सुनील यांच्याशी जुळले आहे. महिलांना केक बनवता येत असल्याने सुनील यांनी अनेक महिलांना काम दिले आहे. तसेच त्यांनी अनेक तरुणांनाही रोजगार दिले आहे.

सुनील यांच्या व्यवसायाची उलाढाल आज कोटींच्या घरात आहे. त्यांना देशभरात आणखी शाखा खोलायच्या आहे, ज्यामुळे आणखी लोकांना त्यांच्या केकचा आनंद घेता येईल. आपल्या कष्टाच्या आणि जिद्दीच्या जोरावर माणूस नक्कीच आपले ध्येय गाठू शकतो, हे सुनील यांनी दाखवून दिले आहे. सुनील यांची गोष्ट अनेकांना प्रेरणा देणारी आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.