आईकडून ४० हजारांचे कर्ज घेऊन भाड्याच्या खोलीत सुरू केली होती पिझ्झा हट कंपनी, वाचा यशोगाथा..

0

कधी कधी नोकरी करायला कंटाळा येतो. आपल्याला जे आवडते ते करायला आपल्याला आवडत असते पण नोकरीमुळे ते आपल्याला करता येत नाही. घरातून ऑफिसमध्ये आणि ऑफिसमधून घरी असाच आपला दिनक्रम झालेला असतो. याच्यातच आपला कोठेतरी जीव अडकलेला असतो.

अशा परिस्थितीत, उर्वरित वेळ सोशल मिडीयावर घालवताना आपल्याला अनेक यशोगाथा पाहायला मिळतात. अशा परिस्थितीत आपल्या मनात काही निराशा असते तसेच काहीतरी मोठे करण्याचा विचारही मनात येतो. हा विचार आपल्या मनात येतो आणि इतिहास घडतो. पिझ्झा हट सुरू करणार्‍या दोन भावांची अशीच एक कथा आहे. ज्यांना नोकरी करायला काहीच हरकत नव्हती.

त्यांची एकच ईच्छा होती की त्यांना स्वताच्या मर्जीचे मालक बनायचे होते. ज्या आवडीने तुम्ही पिझ्झा खाता त्या पिझ्झाची कहाणी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. डॅन आणि फ्रँक कार्नी असे त्या दोन भावांचे नाव होते. ज्यांना कधीही नोकरी करायला आवडत नव्हती त्यांना अशी नोकरी हवी होती जिथे सगळं त्यांच्या मर्जीने व्हायला पाहिजे.

आता अशी कोणतीही नोकरी मिळवणे साहजिकच अवघड होते. दोघांनी चर्चा केली आणि जेव्हा काही चांगले झाले नाही तेव्हा त्यांनी त्यांचा मित्र जॉन बेंडरचा सल्ला घेतला आणि बेंडरने त्यांना पिझ्झा पार्लर सुरू करण्याचा सल्ला दिला. दोघांनी पिझ्झा पार्लर चालु करण्यासाठी त्यांच्या आईकडून ६०० डॉलर्स म्हणजे ४० हजारांचे कर्ज घेतले.

१९५८ मध्ये विशिटा, कंसांसमध्ये पिझ्झा हटची स्थापना झाली. त्याचा मित्र बेंडरही त्याच्याबरोबर होता. तिघांनी ५०३ साऊथ ब्लफ येथे एक छोटेसे घर भाड्याने घेतले आणि पिझ्झा बनविण्यासाठी पहिले सेकंड हँड मॉड्यूलर खरेदी केले आणि ‘पिझ्झा हट’ रेस्टॉरंट उघडले. ज्या रात्री रेस्टॉरंट उघडले तेव्हा त्यांनी फ्रीमध्ये पिझ्झा वाटले होते.

त्यांनी ‘पिझ्झा हट’ हे नाव निवडले कारण त्याने खरेदी केलेल्या लोगोमध्ये केवळ नऊ अक्षरांचीच जागा होती. १९५९ मध्ये पहिले पिझ्झा हट सुरू झाल्यानंतर त्यांच्या ठिकठिकाणी अनेक फ्रेचांयझी आणि रेस्टॉरट्स सुरू झाले. कार्ने बंधूंनी आर्किटेक्ट, रिचर्ड डी. बर्क यांच्याकडे संपर्क साधला ज्यांनी त्यांच्यासाठी एक खास प्रकारचे छत तयार केले होते.

अशा प्रकारे पिझ्झा हटच्या रेस्टॉरंटची नवीन ओळख निर्माण झाली. १९६४ पर्यंत, फ्रँचायझीच्या अंतर्गत कंपनीच्या ऑनरशिप स्टोअरसाठी विशेष प्रकारच्या इमारतीचे डिझाइन आणि लेआउट तयार केले गेले होते ज्यामुळे त्यांची जगभरात ओळख निर्माण झाली होती. आता इमारतीची रचना पाहिल्यानंतर ग्राहकांनी हे पिझ्झा हट आहे हे ओळखण्यास सुरवात केली.

१९७२ पर्यंत, पिझ्झा हटने न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजमध्ये देशातील १४ स्टोअरसह स्टॉक टिकर चिन्ह म्हणून नोंदणी केली होती. १९७८ मध्ये पेप्सीकोने पिझ्झा हट खरेदी केले. नंतर पेप्सीकोने केएफसी आणि टॅको बेल देखील विकत घेतले. १९९७ मध्ये तीन रेस्टोरेंट चेन ट्राइकॉनमध्ये आले आणि तीन रेस्टॉरंटच्या कंपन्या एकत्र आल्या.

६ हजार डॉलर्समध्ये दोन भावांनी कंपनी स्थापन केली होती आज येथे ३० हजार कर्मचारी काम करतात. त्यामुळे तरूणांनो असं कधीच समजू नका की आकाशात दगड फेकल्यावर त्याला छिद्र होत नाही म्हणून काय झालं आपण दगड तरी फेकू शकतो. पुढच्या वेळी जेव्हा जेव्हा ऑफिसमध्ये काम करायचा कंटाळा येईल तेव्हा नैराश्यावर मात करण्यासाठी या दोन भावांची स्टोरी नेहमी लक्षात ठेवा. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कळवा. जर ही माहिती आवडली असेल तर पुढे पाठवायला विसरू नका.

Leave A Reply

Your email address will not be published.