ही महिला एका डुक्कराच्या मदतीने महिन्याला कमवतेय लाखो रुपये, वाचा कसे…

0

 

 

आज आम्ही तुम्हाला अशा एका महिलेची गोष्ट सांगणार आहोत, जिने एका डुक्कराचा जीव वाचवला होता आणि आता तोच डुक्कर तिला लाखो रुपयांची कमाई करुन देत आहे.

साऊथ अफ्रिकेत राहणाऱ्या या महिलेचे नाव जोने लेफसन असे आहे. तिने एका डुक्काराला कत्तलखान्यातून वाचवून घरी आणले होते. आता तेच डुक्कर तिला नवनवीव पेंटिग्स काढून तिला लाखोंची कमाई करुन देत आहे. या डुक्कराचे नाव पिग्कासो असे आहे.

तुम्ही आतापर्यंत आता अनेक चित्रकारांना चित्र काढताना बघितले असेल पण या पिग्कासोची चित्रकला तुम्हालाही आश्चर्याचा धक्का देईल. पिग्कासो सध्या चार वर्षांचा असून तो ३ वर्षांपासून पेंटिंग्स काढत आहे.

तो जेव्हा दोन महिन्याचा होता, तेव्हा लेफसनने त्याला आपल्या घरी आणले होते. लेफसन त्याच्या तोंडामध्ये ब्रश ठेवायची आणि त्याच्यासमोर पेंटिंगचा एक बोर्ड ठेवायची तर तो त्या ब्रशच्या साहाय्याने कलर घेऊन, पेंटिंग काढायचा. अशाप्रकारे त्याने आतापर्यंत खुप पेटिंग्स काढल्या आहेत.

नुकतीच त्याने ब्रिटनचा प्रिंस हॅरीची पेंटिंग काढली होती. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पण ही पेंटींग अडीच लाख रुपयांना विकली गेली होती. स्पेनच्या एका माणसाने खरेदी केली होती.

पिग्कासोने आतापर्यंत अनेक पेंटिंग्स बनवल्या आहेत. या पेटिंग्सपासून जितके पैसे मिळतात, ते सर्व पैसे लेफसन चांगल्या कामासाठी वापरते. लेफसन तिच्या फार्ममध्ये असणाऱ्या जनावरांचे पालनपोषण करण्यासाठी वापरते.

पिग्कासोने ब्रिटेनच्या राणीची सुद्धा पेंटिंग काढली होती. पिग्कासो आता जगभरात प्रसिद्ध होत आहे. त्याला आता जगभरात एक पेंटर म्हणून ओळखले जात आहे.

त्याने आतापर्यंत तयार केलेल्या अनेक पेंटिंग्स लेफसनने तयार केलेल्या वेबसाईटवर आहे. त्याने आतापर्यंत १०० पेक्षा जास्त पेंटिंग्स तयार केल्या असून त्या सर्व पेटिंग्स त्या वेबसाईटवर आहे, त्या पेंटिंग्ससोबत त्या पेंटिंग्सचे नाव आणि त्याची किंमत सुद्धा देण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.