‘पावरी हो रही है’ म्हणणारी, सोशल मिडीयावर व्हायरल होणारी ती तरूणी कोण आहे?

0

सोशल मिडीयावर दररोज काहीना काही व्हायरल होत असतं. त्यामध्ये व्हिडीओ असतात काही फोटोज असतात किंवा एखादा मेसेज असतो. सध्याही व्हिडीओ व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. त्याचे नाव आहे पावरी हो रही है.

खरंतर त्या व्हिडीओचे नाव तसे नाहीये पण त्या व्हिडीओतील हा एक डायलॉग खुप फेमस झाला आहे. इंटरनेटवर सध्या हा व्हिडीओ खुप ट्रेंडमध्ये आहे. हा व्हिडीओ जर तुम्ही पाहिला असेल तर त्यामध्ये एक तरूणी आपल्या मित्रांसोबत पार्टी करत आहे.

व्हिडीओत ती म्हणते की, ये हम है, ये हमारी कार है, और यहांपर हमारी पावरी हो रहीं है. पावरी हो रहीं है म्हणजे तिला म्हणायचे आहे की आमची पार्टी चालू आहे. तो व्हिडीओ इतका फेमस झाला आहे की आता मोठमोठे सेलिब्रिटीसुद्धा या व्हिडीओवरून आपले व्हिडीओ बनवत आहेत

. पण तुम्हाला माहित आहे का की त्या व्हिडीओतील ती तरूणी कोण आहे? पावरी हो रहीं है म्हणणाऱ्या त्या तरूणीचे नाव आहे दानानीर मुबीन. ती पाकिस्तानच्या पेशावर शहरात राहते आणि तिचे वय अवघे १९ वर्षे आहे. ती एक कंन्टेंट क्रिएटर आहे.

ती स्वताला मेकअप आरोग्य, तज्ञ म्हणून सांगत असते. ती फुट ब्लॉगिंगसुद्धा करते. सोशल मिडीयावर ती अनेक व्हिडीओ शेअर करत असते. याशिवाय तिला अनेक छंद आहेत. दादानीरचा एक युट्युब चॅनेलसुद्धा आहे ज्यावर तिच्या अनेक व्हिडीओ आहेत.

इंस्टाग्रामवर दानानीरचे ९५६ के फॉलोवर्स आहेत. तिने ६ फेब्रुवारीला पावरी हो रहीं है या गाण्याचा व्हिडीओ अपलोड केला होता. या व्हिडीओला ६२ लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिले आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तिच्या फॉलोवर्सची संख्या ४ लाखांने वाढली आहे.

तिने बीबीसीला मुलाखत दिली आहे. त्या मुलाखतीत तिने सांगितले की, ती आपल्या मित्रांसोबत पेशावर येथील नाथिया गली येथे गेली होती. याठिकाणी ते सगळेजण जेवायला थांबले होते. त्यानंतर तिने हा व्हिडीओ काढला होता.

तिने हा व्हिडीओ आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला होता. पण तिला हे माहित नव्हते की तिचा हा चार सेकंदाचा छोटासा व्हिडीओ इतका व्हायरल होईल. या व्हिडीओत तिचा पावरी म्हणण्याचा अंदाज लोकांना खुपच आवडला.

त्यानंतर हा व्हिडीओ खुपच व्हायरल झाला. ती म्हणाली की मी अशाप्रकारे कधीच बोलत नाही. केवळ व्हिडीओ मजेशीर व्हावा म्हणून मी पार्टी हा शब्द पॉरी असा उच्चारला. दानानीरची लोकप्रियता भारतातही खुप आहे. भारतीय संगीत दिग्दर्शक यशराज मुखाते यानेही या व्हिडीओवर एक गाणे तयार केले आहे आणि हे गाणेही खुप हिट झाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.