५० पैसे ते दिवसाला २ लाख, पतीच्या अत्याचाराला झुगारुन ‘या’ महिलेने उभे केले आपले साम्राज्य

0

 

आजही देशभरात काही ठिकाणी पुरुषप्रधान संस्कृतीचे वर्चस्व आहे, त्यामुळे अनेक महिलांना दुय्यम दर्जा दिला जातो. काही महिलांना तर त्यांच्या पतीकडुन मारहाण पण होते.

इतके असून पण काही महिला ते सोसत असतात. पण आज आपण एका अशा महिलेची गोष्ट जाणून घेणार आहोत, ज्या महिलेने आपल्या पतीच्या मारहाणीला झुगारुन स्वता:चे साम्राज्य निर्माण केले आहे.

त्या महिलेचे नाव पॅट्रिशीया थॉमस असे आहे. एकेकाळी दिवसाला ५० पैसे कमवणारी महिला आज दिवसाला दोन लाख रुपये कमवत आहे. आज जरी दिवसाला ती लाखो रुपये कमवत असली तरी सुरुवातीला तिच्या आयुष्यात खुप संकटे होती.

पॅट्रिशीया थॉमस यांचे लग्न वयाच्या १७ वर्षी झाले होते. तिने आंतरधर्मीय लग्न केल्याने तिचे कुटुंब पण नाराज होते. त्यामुळे तिच्या घरच्यांनी तिच्याशी संबंध तोडले होते.

तिच्या पतीचे नाव नारायण असे होते. ज्या मुलासाठी ती घर सोडून आली तोच माणूस व्यसनी निघाला. घरात पैसे कमवायलाच कोणी नव्हते, त्यामुळे लग्न करुन चुक झाल्याचेही तिला अनेकदा वाटायचे. अशात त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी झाली.

घरात पैसे यायचे नाही त्यामुळे आपणच काही तरी करायला पाहिजे, असे तिने ठरवले. पण शिक्षण नसल्यामुळे तिला नोकरी करणे शक्य नव्हते, त्यामुळे स्वता:चा काहीतरी व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला.

गर्भवती असताना तिने जॅम, लोणची बनवून ते विकण्याचे काम केले. तिला या कामात चांगलाच फायदा होत होता, पण हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात करण्यासाठी तिच्याकडे भांडवल उपलब्ध नव्हते.

तिला हा व्यवसाय वाढवण्यासाठी तिच्या वडिलांच्या मित्रांनी तिला मदत केली. त्यामुळे पॅट्रिशीयाला मरीना बीचसमोर छोटीशी स्नॅकची दुकान सुरु करता आली.

पॅट्रिशीयाचा सुरु होणारा प्रवास वाटत होता तेवढा सोपा नव्हता. तिच्या दुकानावर पहिल्या दिवशी फक्त एक कप चहा विकला गेला. त्यामुळे त्यादिवशी तिला फक्त ५० पैसे मिळाले.

पहिल्या दिवशी चांगला व्यवयाय झाला नसल्यामुळे पॅट्रिशीया निराश झाली होती. पण तेव्हा तिच्या आईने तिला धीर दिला आणि तिने पुन्हा कामास सुरुवात केली. पुढच्या दिवशी तिचा चांगलाच व्यवसाय झाला आणि हळुहळू तिचा हा व्यवासाय वाढू लागला.

नवरा कित्येक महिने घरातून गायब रहायचा ज्यादिवशी घरात यायचा त्यादिवशी तिला मारहाण करायचा. तिचे पैसे घ्यायचा, तिला सिगरेटचे चटके द्यायचा. पण तिने आपले पुर्ण लक्ष आपल्या व्यवसायावर ठेवले.

एक दिड वर्षात तिने केटरींगचे काँट्रक्ट घेण्यास सुरुवात केली. तिला वेगवेगळ्या कंपन्यांकडून, सरकारी कार्यालयांकडून ऑर्डर मिळू लागल्या. अशात तिला तिला रोज २ हजार लोकांच्या जेवणाची मोठी ऑर्डर मिळाली. सन १९९८ मध्ये ती संगीता ग्रुपच्या नेल्सन मॅनकाम रोड रेस्टॉरंटची डायरेक्टर झाली.

२००२ मध्ये तिच्या पतीचे निधन झाले. तसेच काही दिवसातच एका अपघातात तिच्या मुलीचे आणि जावायाचे निधन झाले. पण ती परिस्थितीसमोर झुकली नाही. तिने पुन्हा कामास सुरुवात केली.

आपल्या मुलाला हाताशी घेऊन तिने संदिपा नावाचे रेस्टॉरंट उघडले. तिच्या या रेस्टॉरंटची चांगलीच प्रसिद्धी मिळाली. आज तिचे रेस्टॉरंटची एक चेन आहे. तिच्या रेस्टॉरंटमध्ये जवळपास २०० लोक काम करत आहे.

दिवसाला ५० पैसे कमवणारी हि महिला आता दिवसाला २ लाख रुपये कमवत आहे. आज पॅट्रिशीया एक यशस्वी उद्योजिका आहे. तीचा आजपर्यंतचा प्रवास अनेक महिलांसाठी प्रेरणादायी आहे

Leave A Reply

Your email address will not be published.