पार्ले हे नाव कसे पडले? महागाई वाढली तरी पार्ले-जी ५ रूपयांनाचा का मिळते? वाचा पार्लेची यशोगाथा

0

आज पार्ले-जी चे देशात १३० हून अधिक कारखाने आहेत आणि जवळपास ५० लाख किरकोळ स्टोर्स आहेत. दरमहा पार्ले-जी १ अब्जाहून अधिक पॅकेट बिस्किटे तयार करते. ज्या ठिकाणी वाहतुक नीट नाही किंवा वस्तू नीट पोहचत नाहीत त्या ठिकाणीसुद्धा तुम्हाला पार्ले-जी बिस्कीट पाहायला मिळेल.

लहान मुले सोडा, मोठ्या वडीलधाऱ्या माणसांनाही पार्ले-जी चे नाव माहित आहे. पार्ले-जी बिस्किटे लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सगळे खातात. जर तुम्हाला ते सकाळी चहाबरोबर खायचे असेल किंवा आपल्याला भूक लागली असेल तर पोट भरण्यासाठी खायचे असेल किंवा टाईमपास खाण्यासाठी सगळेजण पार्ले-जीची निवड करतात.

तरच ही कंपनी केवळ बिस्किटमधून पैसे कमवत नाही तर लोकांकडून तिला प्रेमही मिळते. परंतु तुम्हाला माहित माहित आहे का पार्ले-जी बिस्कीट कंपनी कशी सुरू झाली? या कल्पनेची एक रंजक कथा आहे. पार्ले-जीचे मालक मोहन दयाल चौहान यांना बिस्किटे नव्हे तर मिठाई (मिठाई आणि चॉकलेट इ.) बनवायचे होते.

मोहन दयाल चौहान यांच्या मुलांनाही या कामात मदत करायची होती. या तयारीतच हाऊस ऑफ पार्लेची स्थापना १०२८ मध्ये झाली. नंतर मोहन दयाल यांनी चॉकलेट बनवायचे सोडून दुसरे काहीतरी करण्याचे ठरवले. चौहान यांनी वयाच्या १७ व्या वर्षी कपड्यांचा व्यवसाय म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली आणि पुढे बरेच बिझनेस सुरू केले.

मोहन दयाल चौहान यांना व्यवसायात यश आले आणि ते चांगली कमाई करू लागले. यात त्यांच्या मुलांचाही पूर्ण पाठिंबा मिळाला आणि त्यांनीही वडिलांना खुप मदत केली. कंपनीत नवीन नवीन आयडिया वाढत गेल्या आणि दयाल यांना त्यांच्या मुलांनी अनेक सल्ले दिले. दयाल चौहान यांच्या मुलांनी वडिलांना काहीतरी नवीन व्यवसाय करण्याचा सल्ला दिला.

अनेक वेगवेगळ्या पर्यायांमध्ये त्यांनी विचार करण्यास सुरूवात केली. कपड्यांच्या व्यवसायात गुंतलेल्या दयाल चौहान यांनी आपले पुर्ण लक्ष नंतर मिठाईवर केंद्रित केले आणि ते पुढील व्यवसायासाठी जर्मनीमध्ये निघून गेले. तेथे त्यांना मिठाई तंत्रज्ञान आणि व्यवसायाची नवीन तंत्रे शिकायला मिळाली.

१९२८ मध्ये मोहन दयाल चौहान यांनी ‘हाऊस ऑफ पार्ले’ ची स्थापना केली. या नावामागे एक रंजक कथा देखील आहे. मुंबईतून विलेपार्ले येथे हलविण्यात आल्याने या कंपनीचे नाव पारले असे ठेवले गेले. विलेपार्ले येथून कंपनीला पार्ले हे नाव मिळाले. मिठाई बनवणारे पहिले मशीन १०२९ मध्ये बसविण्यात आले होते.

काम सुरू झाले आणि पार्ले कंपनीत मिठाई, पेपरमिंट, टॉफी इ. बनवण्यास सुरुवात झाली. ग्लुकोज, साखर आणि दुधासारख्या कच्च्या मालापासून या गोष्टींचे उत्पादन होत होते. सुरुवातीच्या टप्प्यात, १२ कुटुंबातील लोक यामध्ये काम करत असत. या कुटुंबातील लोक पॅकेजिंगपासून सर्व कामे बघत असत.

सीएनबीसी टीव्ही १८ च्या अहवालानुसार कंपनीकडून बाजारात येणारे पहिले उत्पादन ‘ऑरेंज बाइट’ होते. या टॉफीने बरेच नाव कमावले आणि पार्ले यांचे नाव लोकांच्या जिभेवर नेहमी असायचे. हा एक काळ होता जेव्हा बिस्किटांना प्रीमियम उत्पादनात गणले जात होते, जे बहुतेक ब्रिटिश किंवा देशातील श्रीमंत लोक खायचे.

त्यावेळी बहुतांश बिस्किटे परदेशातून मागवली जात असत. १९३८ मध्ये, पार्लेने ठरवले की ते अशी बिस्किटे बनवतील जी देशातील सामान्य माणूसदेखील खरेदी करुन खाऊ शकेल. याच अनुक्रमे पार्ले ग्लूकोज बिस्किटांचे उत्पादन सुरू झाले. ही बिस्किटे स्वस्त होती आणि सर्वत्र बाजारात उपलब्ध होती, त्यामुळे थोड्या दिवसातच ही बिस्कीटे घरोघरी दिसू लागली.

या बिस्किटांमध्ये एक खास गोष्ट अशी होती की हे बिस्कीट भारतातच तयार केले गेले होते आणि यामध्ये एकही विदेशी पदार्थ नव्हता. आता ब्रिटिश असे म्हणूच शकत नव्हते की आम्हीच बिस्किटे खातो किंवा त्यांच्या बनवलेल्या बिस्कींटावर लोक अवलंबून आहेत. या भावनेने देशातील लोकांना पूर्णपणे वेधले होते.

पार्ले आता एक बिस्किटाची कंपनी नाही तर भारत देशाची ओळख बनली आहे. पार्ले ग्लुकोज बिस्किट्स देशात प्रसिद्ध झालेच पण, दुसर्‍या महायुद्धात ब्रिटीश आणि भारतीय सैन्यातील जवानांनीही या बिस्कीटाला खुप पसंत केले. आता पार्ले यांची कंपनी खुप पुढे निघून गेली होती. अशा परिस्थितीत, १९४० मध्ये, कंपनीने प्रथम खारट बिस्किटे सॉल्टेड क्रॅकर-मोनॅको बनविणे सुरू केले.

तोपर्यंत देशाची १९४७ मध्ये विभागणी झाली आणि गहु हा बिस्कीटाचा मुख्य स्त्रोत असल्यामुळे त्याची कमतरता भासू लागली. त्यांना नाईलाजाने ग्लुको बिस्किटांचे उत्पादन थांबवावे लागले. या संकटावर मात करण्यासाठी पार्ले वेगवेगळी बिस्कीटे बनविण्यास सुरूवात केली. १९४० मध्ये, पार्ले ही अशी कंपनी बनली जिची जगातील सर्वात लांब २५० फीडची भट्टी होती.

नंतर आणि ब्रिटानिया बाजारात आले आणि पार्लेच्या ग्लूकोसारखे ग्लूकोज-डी बनवायला सुरूवात केली. बाजारात आपली प्रसिद्धी टिकवून ठेवण्यासाठी पार्ले यांनी ८० च्या दशकात ग्लूकोचे नाव बदलून पार्ले-जी असे ठेवले. पॅकेटचा रंगही बदलला आणि बिस्किट पांढर्‍या आणि पिवळ्या रंगाच्या कव्हरमध्ये येऊ लागले.

त्यावर ‘पार्ले-जी गर्लचे’ चित्र छापण्यात आले होते. सुरुवातीला ‘जी’ म्हणजे ग्लूकोज होते, परंतु २००० च्या दशकात ते ‘जीनियस’ म्हणून ओळखले जाऊ लागले. पार्ले-जी मुलीबद्दल बर्‍याच कथा आहेत, ज्यामध्ये असे म्हटले जाते की तत्कालीन प्रख्यात कलाकार मगनलाल डैयाने ६० च्या दशकात त्या मुलीचे चित्र काढले होते जी बॉक्सवर झळकली होती.

आज पार्ले-जीचे देशात १५० हून अधिक कारखाने आहेत आणि जवळपास 50 लाख किरकोळ स्टोअर आहेत. दरमहा पार्ले-जी १ अब्जाहून अधिक पॅकेट बिस्किटे तयार करते. आज भारतातील प्रत्येक गल्लीत, शहरात, गावात आपल्याला पार्लेजी बिस्कीट पाहायला मिळेल. पण आजही पार्ले-जीच्या बिस्कीटाच्या पुड्याची किंमत ५ रूपये आहे. महागाई इतकी वाढली तरी त्यांनी किंमत वाढवली नाही.

त्यांना तोटा कसा होत नाही असा प्रश्न अनेकांना पडला असेल? पण तुमच्या माहितीसाठी जसेजसे कच्च्या मालाच्या किंमतीत वाढ होत गेली तसतसे पार्लेने आपल्या बिस्कीटांच्या पुड्यातील वजन कमी केले. तुम्ही जर नीट लक्ष दिले तर तुम्हाला ते जाणवेल. त्यांनी किंमत वाढवण्याएवजी पुड्याचे वजन कमी केले आहे. पहिल्यांदा ५ रूपयांच १०० ग्रॅम नंतर किंमत तीच राहिली पण वजन मात्र ९० ग्रॅम आणि ८० ग्रॅम असे वजन कमी होत गेले.

२०१९ मध्ये याच पुड्याचे वजन ६५ ग्रॅम झाले होते. पुड्यावर असाही उल्लेख होता ५५ ग्रॅम प्लस १० ग्रॅम. त्यामुळे पार्ले-जीला तोटाही होत नाही आणि त्यांची लोकप्रियताही कमी होत नाही. कच्च्या मालामधील कॉस्ट कमी केला तर नफा वाढतो असे त्यामागचे गणित आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कळवा. जर ही माहिती आवडली असेल तर पुढे पाठवायला विसरू नका.

Leave A Reply

Your email address will not be published.