आत्मनिर्भरतेचे अनोखे उदाहरण! वाचा, फक्त बिस्किट नाही तर देशाची आत्मा बनलेला ‘पार्लेजी’चा भन्नाट प्रवास

0

 

‘जी माने जिनियस’ अशी ओळख असणारा पार्ले हा देशातलाच नाही तर जगातला एक प्रतिष्ठित ब्रँड आहे. देशात असे कोणी नसेल ज्याला पार्लेजी माहित नाहीये. पार्लेजी स्वदेशी असलेला खुप प्रसिद्ध ब्रँड आहे.

भारताचा पहिला बिस्किटचा कारखाना असणाऱ्या पार्लेजीची सुरुवात स्वातंत्र्यापुर्वीच झाली होती. त्याचा प्रवास आजही तितक्याच वेगाने सुरु आहे. कोरोनाच्या संकटात बाजारातील वेगवेगळ्या उत्पादकांवर वाईट परिणाम झाला असताना पार्लेजीने भन्नाट विक्री केली होती.

पार्लेजी बिस्किट निर्माण करणारी कंपनीचे पार्ले आहे. १९२९ मध्ये जेव्हा ही कंपनी सुरू झाली तेव्हा ही कंपनी फक्त संत्र्यांची कँडी आणि किसमी टॉफी बनवायची. या कंपनीचे संस्थापक मोहनलाल दयाल हे होते.

त्याकाळी भारतात इंग्रज कंपन्या कँडी आणि बिस्किट बनवायच्या पण त्यांची किंमत खूप महाग होती. त्यामुळे ते सामान्य नागरिकांना परवडत नसे. त्यावरूनच मोहनलाल दयाल यांना ही कंपनी सुरू करण्याची कल्पना सुचली.

त्यानंतर दयाल यांनी जर्मनीला जाऊन कँडी बनवण्याचे तंत्र शिकून घेतले. तसेच तिथून येताना त्यांनी ६० हजारांचे कँडी बनवण्याचे मशीन आणले. मशीन आणले कँडी बनवण्यास सुरुवात झाली पण आ ब्रँडचे नाव काय ठेवायचे यावर विचार सुरू झाला.

ज्या ठिकाणी या कंपनीचा कारखाना होता तर ठिकाण पार्ला म्हणून ओळखले जायचे. त्यामुळे या ब्रँडचे नाव पार्ले ठेवण्यात आले. १९३९ पासून या कंपनीत बिस्किट बनवण्यास सुरुवात झाली होती.

सुरूवातीला या बिस्किटाचे नाव पार्ले ग्लुको बिस्किट असे होते १९९६ पासून २००६ पर्यंत बिस्कीटाच्या किंमतीत बदल करण्यात आला नव्हता. आज हा ब्रँड खूप लोकप्रिय झाला आहे,    लहाण्यांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकाच्या जिभेवर पार्लेजीचीच चव आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.