एकेकाळी मुंबईच्या चाळीत सिंगल रुममध्ये राहणाऱ्या पंकज त्रिपाठीने आज मुंबईमध्ये खरेदी केले करोडोंचे घर

0

पंकज त्रिपाठी हे अभिनय क्षेत्रातील खुप मोठे नाव आहे. त्यांनी त्यांच्या अभिनयाने अनेकांची मने जिंकली आहेत. त्यांचा अभिनय क्षेत्रातील प्रवास खुपच प्रेरणादायी आहे. अनेक वर्षाच्या कष्टाचे फळ आज त्यांना मिळत आहे.

काही दिवसांपूर्वीच पंकज त्रिपाठीने मुंबईच्या पॉश भागात स्वत साठी नवीन घर खरेदी केले आहे. त्यांनी सोशल मिडीयावर या गोष्टीची माहीती चाहत्यांना दिली. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांना स्वत साठी घर खरेदी करण्याची इच्छा होती. आत्ता त्यांनी त्यांचे हे स्वप्न पुर्ण केले आहे.

पंकज त्रिपाठीच्या या घराची किंमत करोडोंमध्ये आहे. त्यासोबतच त्यांनी घराच्या सजावटीसाठी देखील करोडो रुपये खर्च केले आहे. एका मोठ्या डिझायनरने त्यांच्या घराचे डिझाईन केले आहे. त्यामूळे घरातील प्रत्येक कोपरा खुपच सुंदर आणि आकर्षित दिसतो.

पंकज त्रिपाठीच्या घरातून समूद्रकिनारा दिसतो. त्यामूळे त्यांच्या घराची ही एक वेगळी खासियत आहे. पंकज त्रिपाठीने त्यांच्या सोशल मिडीयावर आकाऊंटवर त्यांच्या घराचे अनेक फोटो शेअर केल्या आहेत. त्यांच्या घराचे फोटो बघून चाहते देखील खुप आनंदी आहेत.

घरासोबतच पंकज त्रिपाठीने नवीन गाडी देखील खरेदी केली होती. त्यामूळे त्यांच्या गाड्यांच्या कलेक्शनमध्ये अजून एक गाडी सामील झाली आहे. त्यांच्याकडे करोडोंच्या गाड्या आहेत. हे यश मिळवण्यासाठी त्यांनी अनेक वर्ष मेहनत केली होती. सुरुवातीच्या दिवसांमध्ये ते एका रुममध्ये मित्रांसोबत राहत होते.

पंकज त्रिपाठीचा जन्म बिहारमधील एका छोट्या गावात झाला होता. त्या गावात अनेक वर्षे वीजपुरवठा देखील नव्हता. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या गावात वीजपुरवठा सुरू झाला आहे. अशा गावात जन्मलेले पकंज त्रिपाठी आज इंडस्ट्रीतील स्टार आहेत.

पंकज त्रिपाठीचे वडील शेतकरी आहेत. त्यासोबतच ते पुजारी देखील आहेत. शाळेत असताना ते गावातील अनेक नाटकांमध्ये सहभागी व्हायचे. त्यामुळे गावामध्ये त्यांना चांगलीच ओळख मिळाली होती. लोक त्यांचे कौतूक करायचे. म्हणून त्यांच्या मनात अभिनेता होण्याची इच्छा निर्माण झाली.

१९९८ मध्ये पंकज त्रिपाठीने ‘सत्या’ चित्रपट पाहिला. हा चित्रपट पाहिल्यानंतर त्यांनी अभिनेता होण्याचा निर्णय घेतला. कारण मनोज बाजपेयी पंकज त्रिपाठीच्या शेजारील गावचे होते. शेजारील गावातील मुलगा बॉलीवूडमध्ये हिरो बनू शकतो. तर आपणही हिरो बनू शकतो. असे त्यांना वाटू लागले.

त्यानंतर त्यांनी अभिनेता बनण्याची तयारी सुरू केली. त्यांनी एनएसडीमध्ये ( नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा ) प्रवेश घेण्याची तयारी सुरू केली. पहिल्या प्रवेश परीक्षेत ते नापास झाले. दुसऱ्या परीक्षेत पण नापास झाले. तिसऱ्या परीक्षेत मात्र ते पास झाले आणि त्यांना एनएसडी प्रवेश मिळाला.

करिअरच्या सुरुवातीला पंकज त्रिपाठी काही दिवस शुज ( चप्पल ) विकत होते. तर एक वर्ष त्यांनी कुक म्हणून देखील काम केले आहे. त्यानंतर त्यांना पहिल्यांदा ‘रन’ चित्रपटामध्ये काम मिळाले. या चित्रपटात त्यांची भुमिका फक्त काही सेकंदाची होती.

या चित्रपटासाठी त्यांना आठ हजार रुपये मिळाले होते. ही रक्कम त्यांच्यासाठी खुप खास होती. कारण त्यांच्या पेमेंटच्या चेकवर श्रीदेवीची साइन होती. आज पंधरा वर्षांनंतर ते श्रीदेवीच्या मुलीसोबत काम करत आहेत. ही खुप मोठी गोष्टआहे.

पंकज त्रिपाठी गावाकडून आले होते म्हणून त्यांचा आवाज खुप खराब होता. त्यामुळे त्यांना त्यांच्या आवाजावर देखील खुप काम करावे लागले. त्यासोबतच त्यांना काम मिळवताना देखील खुप जास्त मेहनत करावी लागत होती.

पंकज त्रिपाठीने ‘लक्ष्य’ चित्रपटासाठी ऑडीशन दिले होते. त्यात त्यांना यश मिळाले आणि त्यांना लक्ष्य चित्रपटात काम देखील मिळाले. त्यांनी ह्रितिक रोशनसोबत अनेक दिवस चित्रपटाची शुटिंग केली. ते खुप आनंदी होते.

पंकज त्रिपाठीने गावाकडे गेल्यानंतर सर्वांना सांगितले की, ते ह्रितिक रोशनसोबत लक्ष्य चित्रपटात काम करत आहेत. त्यांच्या घरातील सर्वजण खुप आनंदी झाले. चित्रपट रिलीज झाल्यानंतर ते पुर्ण परिवाराला घेऊन चित्रपट बघण्यासाठी गेले होते.

चित्रपट पाहिल्यानंतर त्यांना खुप मोठा धक्का बसला. कारण त्या चित्रपटामध्ये पंकज त्रिपाठीने निभावलेली सगळी भुमिका एडिट करण्यात आली होती. ते चित्रपटात कुठेच दिसले नाहीत. मोठ्या अभिनेत्यांसाठी त्यांचा रोल एडिट करण्यात आला होता. हे पाहून ते खुप दुःखी झाले.

त्यांनी अनेक वर्षे बॉलीवूडमध्ये संघर्ष केला. पण त्यांना यश मिळत नव्हते. त्यांनी अभिनय सोडायचा विचार केला होता. पण त्याच कालावधीमध्ये त्यांना ‘गँग्स ऑफ वासेपुर’ हा चित्रपट मिळाला. या चित्रपटाने त्यांना यश मिळवून दिले.

या चित्रपटाने त्यांना अभिनेता म्हणून प्रसिद्ध केले होते. या चित्रपटानंतर त्यांचा अभिनय पाहून त्यांना अनेक चित्रपटां ऑफर आल्या. त्यांनी रंगरेझ, मांजी, फुकरे, गुंडे, मांजी, न्यूटन, काला, स्त्री यांसारख्या अनेक चित्रपटात काम करून प्रसिद्धी मिळवली.

चित्रपटांसोबत अनेक वेबसीरिजच्या माध्यमातून त्यांनी लोकांची मने जिंकून घेतली. करिअरच्या सुरुवातीला पंकज त्रिपाठीकडे काम नव्हते. आत्ता पंकज त्रिपाठी वर्षाचे ३६५ दिवस काम करत असतात.

पंकज त्रिपाठीने कॉलेजमध्ये असतानाच ठरवले होते की त्यांना लव्ह मॅरेज करायचे आहे. त्यामुळे त्यांनी मृदलासोबत २००४ मध्ये लग्न केले होते. सुरुवातीला पंकज त्रिपाठी बॉलीवूडमध्ये येण्यासाठी मेहनत करायचे. तेव्हा त्यांची पत्नी काम करत होती. अनेक वर्षे त्यांच्या पत्नीनेच त्यांचं घर सांभाळले होते.

महत्वाच्या बातम्या –

…जेव्हा सलमान खान आणि शाहरूखच्या भांडणाचा फायदा राणी मुखर्जीला झाला होता, वाचा पुर्ण किस्सा

श्वेता बच्चनच्या लग्नात खुप रडले होते अमिताभ बच्चन; फोटो सोशल मीडियावर झाले व्हायरल

बॉलीवूडच्या ‘या’ अभिनेत्रीने पाण्याखाली केला होता हनीमून; पहा फोटो

फ्लाईटमध्ये दारु पिऊन टल्ली झाली होती प्रियंका चोप्रा; त्यानंतर तिने जे केले ते ऐकून धक्का बसेल

Leave A Reply

Your email address will not be published.