आठवेळा अपयश आलेला पंकज घेणार आता गगनभरारी; भारतीय हवाई दलात झाली निवड

0

 

आयुष्यात येणाऱ्या पराभवांचा आपण जर हिमतीने सामना करत असू आणि ध्येय गाठण्यासाठी धडपड करत असू तर एक ना एक दिवस आपल्याला यश नक्की मिळतेय. आजची ही गोष्ट पण अशाच एका तरुणाची आहे.

नाशिकच्या पंकज जांगरा प्रत्येक प्रसंगातून शिकवण घेत स्वतःला सिद्ध केले आहे. तब्बल आठवेळा मिळालेल्या अपयशनानंतर पंकज भारतीय हवाई दलात वैमानिक म्हणून दाखल होणार आहे.

पंकज येत्या २८ जानेवारीला हैद्राबादच्या डूंडीगल येथील इंडियन एअर फोर्स अकॅडमित वैमानिक प्रशिक्षणासाठी दाखल होणार आहे. आपल्या आयुष्यात आलेल्या अपयशातून खचून न जाता त्याने यश मिळवले आहे. त्यामुळे आता तो अनेकांसाठी रेरणदायी बनला आहे.

शालेय जीवनापासूनच त्याला वैमानिक बनायचे होते. त्यासाठी त्याने अथक मेहनत घेतली. त्याने बारावीत असताना एनडीएची परीक्षा दिली मात्र यात त्याला यश आले नाही.

पुढे त्याने अभियांत्रिकीच्या अभ्यासासोबतच एअर फोर्स कॉमन ऍडमिशन टेस्ट तसेच कमबाईंड डिफेन्स सर्व्हिसेस एक्सामिशन या परीक्षांची तयारी सुरू केली.

दोन्ही परीक्षा पास करून तो मुलाखतीपर्यंत पोहचला, पण त्याला अपयश आले. अशाप्रकारे त्याला सलग आठवेळा मुलाखतीत अपयश आले, नवव्या प्रयत्नाला मात्र तो त्याने स्वतःला सिद्ध केले आणि तो मुलाखतीत पास झाला.

अनेकदा आपण एका अपयशात खचून जातो, पण आठवेळा अपयश येऊन पंकजने घेतलेली मेहनत आणि त्यानंतर भारतीय हवाई दलात झालेली निवड अनेकांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.