पालवनकर बाळू: भारताचे पहिले दलित क्रिकेटर ज्यांनी आंबेडकरांच्या विरोधात निवडणूक लढवली होती

0

साल होते १९८२ चे. पुण्यातील इंग्रजांच्या क्रिकेट क्लबमध्ये एक मुलगा काम करायला लागला. तो माळीकाम करत असे. त्याचबरोबर त्याच्याकडे पिच रोल करणे, मैदान सांभाळणे आणि नेट्स लावणे ही जबाबदारीही तोच पार पाडायचा.

तो एकदा काम करत असताना टीममधील एक खेळाडू जेजी ग्रेग त्याच्याजवळ आला आणि त्याला गोलंदाजी करायला लावली. त्या भारतीय मुलाच्या गोलंदाजीने तो इंग्रज खेळाडू अवाकच झाला. त्यानंतर तोच मुलगा भारतीय टीममध्ये सामिल झाला आणि इंग्रजांच्या विरोधात खेळू लागला. हा खेळाडू होता पालवनकर बाळू.

बाळू भारताचे पहिले दलिक क्रिकेटर होते. १९ मार्च १८७६ ला त्यांचा जन्म झाला होता. बाळू यांचे कुंटुंब चमडे बनवायचे काम करायचे. त्यांचे वडिल आर्मीमध्ये होते. बाळू आणि त्यांचा भाऊ शिवराम यांनी पुण्यात सेनेच्या अधिकाऱ्यांनी सोडलेल्या सामानातील क्रिकेटच्या सामानाने क्रिकेट शिकायला सुरूवात केली.

बाळू यांना आपल्या जीवनात भेदभावाचा खुप सामना करावा लागला होता. त्या काळात आजच्यापेक्षा जास्त जातीभेद होता. तेव्हा क्रिकेट हा खेळ जास्तकरून राजा महाराजांची मुले खेळत असत किंवा उच्च जातीचे लोकच क्रिकेट खेळत असत.

अशावेळी बाळू ज्या जातीचे होते त्या जातीवरून त्यांना खुप विरोध सहन करावा लागला होता. १८९२ मध्ये पूना क्लबमध्ये त्यांना माळीची नोकरी लागली होती. त्यांना महिन्याला ४ रूपये पगार होता. त्यांनी आपल्या फिरक्या गोलंदाजीने इंग्रजांच्या नाकी नऊ आणले होते.

जीजे ग्रेग नावाचा एक इंग्रजी खेळाडू त्यांच्यासोबत रोज एक तास प्रॅक्टीस करत असे. आणि जेव्हापण ग्रेग आऊट व्हायचा तो बाळू यांना ५० पैसै द्यायचा. ते रोज प्रॅक्टीस करायचे त्यामुळे त्यांना खुप फायदा झाला. नंतर पुण्यातील हिंदु टीमने इंग्रजांना मॅच खेळण्यासाठी आव्हान दिले.

या मॅचमध्ये बाळू यांना हिंदू टीमकडून खेळण्याची संधी मिळाली. असे म्हणतात की बाळूच्या गोलंदाजीच्या जोरावर हिंदु टीमने इंग्रजांना धुळ चारली होती. पण या सामन्याच्यावेळीसुद्धा बाळूला भेदभावाचा सामना करावा लागला होता.

जेव्हा बाळू विकेट घ्यायचे तेव्हा कोणच त्यांच्यासोबत सेलिब्रेशन करायला येत नव्हते. तसेच सामन्याच्या बाहेर त्यांच्या खान्या पिण्याच्या वस्तूही वेगळ्या ठेवण्यात आल्या होत्या. मैदानात उतरायच्या आधी त्यांना त्यांची भांडी स्वता धुवावी लागत असत.

बाकीचे खेळाडू त्यांच्यासोबत बसत नव्हते आणि बोलतही नव्हते. पण त्यांच्या गोलंदाजीमुळे त्यांना टीममध्ये स्थान मिळत राहिले. १९०१ मध्ये महाराजा ऑफ नटोर ही टीम सगळ्यात मजबूत मानली जायची. बाळू या टीमचे हिस्सा होते.

१९११ मध्ये ही टीम इंग्लंड दौऱ्यावर गेली होती. तेथे त्यांनी २३ सामने खेळले. त्या २३ सामन्यात त्यांनी ११४ बळी घेतल्या होत्या. भेदभावामुळे त्यांना नेहमी कर्णधाराच्या पदापासून लांब ठेवण्यात आले होते. त्यानंतर काही काळाने भेदभाव कमी होऊ लागला होता.

१९२० मध्ये बाळू राजकारणात उतरले. त्यावेळी ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या खुप जवळ होते. पण १९३२ मध्ये त्यांनी आंबेडकरांच्या वंचितांना वेगळे निवडणुक क्षेत्राच्या मागणीचा विरोध केला. त्यानंतर बाळू यांनी पुणे पॅक्टवर सही केली होती.

त्यानंतर त्यांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला. १९३३ मध्ये त्यांनी आंबेडकरांच्या विरोधात निवडणुक लढवली पण खुप अटीतटीच्या फरकाने ते निवडणूक हारले होते. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कळवा आणि जर ही माहिती आवडली असेल तर पुढे पाठवायला विसरू नका.

Leave A Reply

Your email address will not be published.