हा अभिनेता एका रात्रीत कसा झाला मेगा मीमस्टार, वाचा पुर्ण स्टोरी

0

 

 

इंग्लिशमध्ये असे म्हणतात big things come in small package, तर मराठीत पण अशी एक म्हण आहे की मुर्ती लहान, किर्ती महान. दोन्ही म्हणींचा एकच अर्थ होतो तो म्हणजे कोणत्याही कमी उंची असणाऱ्या व्यक्तीला आपण कमी समजले नाही पाहिजे.
आजची ही गोष्ट पण अशात एका व्यक्तीची आहे. नाव आहे ओसिता इहेम. तुम्ही यांचे नाव कदाचितच ऐकले असेल पण त्यांचा फोटो पाहिला तर तुम्ही पटकन त्यांना ओळकखून घ्याल. ओसिता यांना मेगास्टार मीम म्हणून ओळखले जातात.

ओसिता हे नॉलीवूड म्हणजेच नायझेरियन चित्रपटसृष्टीचे अभिनेता आहेत. अनेकदा तुम्ही यांना मीममध्ये बघितले असेल त्यांची उंची कमी असल्याने अनेकांचा असा गैरसमज आहे कि हा एक लहान मुलगा आहे.

ओसिता यांचा जन्म २० फेब्रुवारी १९८२ ला झाला होता. त्यांचे जास्ती करुन मीम्स हे २००२ मध्ये त्यांचा आलेली फिल्म अकी ना उकवा आणि २००७ मध्ये आलेली स्टबर्न फाइल्स या फिल्ममधल्या त्या क्लिप्स आहेत.

अकी ना उकवा हा त्यांचा पहिला चित्रपट होता. या चित्रपटात त्यांचे नाव पावपाव होते. त्यामुळे नायझेरियाचे लोक त्यांना पावपाव नावानेच ओळखले जाते. सुरुवातीला त्यांना लहान मुलांचीच भुमिका निभावणारे चित्रपट भेटायचे, पण त्यानंतर ओसिमा यांनी वेगवेगळ्या भुमिका निभावल्या आहे.

ओसिता यांनी आतापर्यंत १०० पेक्षा जास्त चित्रपट केले आहे. २००७ मध्ये तर ओसिता यांना अफ्रिका मुवी अवॉर्डमध्ये त्यांना लाईफ टाईम अचिवमेन्ट अवॉर्ड मिळाला आहे. अभिनेत्यासोबतच ओसिता एक लेखक सुद्धा आहे. त्यांनी लोकांना प्रेरणा देणारी इंस्पायर्ड १०१ हे पुस्तक लिहले आहे.

ओसिता यांच्या वेगवेगळ्या चित्रपटांमधील भुमिका जगभर प्रसिद्ध झाल्या आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे २०११ मध्ये त्यांना नाझेरियाचे राष्ट्राध्यक्ष गुडलक जोनाथन यांनी ओसिता यांना सन्मानित केले होते.

ओसिता मीम स्टार बनवण्यामागे ब्राझीलमध्ये राहणाऱ्या निकोल यांचा हात आहे.निकोला यांनी ओसिता यांचा एक चित्रपट बघितला तो त्यांना इतका आवडसा की एक-एक करुन त्यांनी ओसिता यांचे सर्व चित्रपट बघितले.

पुढे निकोल यांनी ट्विटर @nollywoodroll नावाने एक अकाऊंट बनवले. त्या अकाऊंटवर निकोलने ओसिता यांचे फनी क्लिप्स टाकण्यास सुरुवात केली. ते इतके व्हायरल झाले की ओसिता यांना एक नवीनच ओळख मिळाली. तर असा होता त्यांचा एक अभिनेता ते मीमस्टार प्रवास. चला तर मग पाहू या….

Leave A Reply

Your email address will not be published.