नोकरीला कंटाळलात? अवघ्या ५० हजारात घरबसल्या सुरू करा हा व्यवसाय, महिन्याला कमवा कोट्यावधी

0

तुम्ही जर नोकरी करून कंटाळला असाल तर तुमच्यासाठी ही माहिती महत्वाची आहे. तुम्ही आता स्वताचा व्यवसाय सुरू करू शकता. यासाठी तुम्हाला फक्त ५० हजार रूपये लागणार आहेत. हा बिझनेस आहे ऑनलाईन होर्डिंगचा. आजच्या डिजीटल युगात ऑनलाईन होर्डिंग्सचा बिझनेस खुप फॉर्ममध्ये आहे.

यामधून तुम्ही प्रचंड नफा कमवू शकता. आज आम्ही तुम्हाला अशा महिलेबद्दल सांगणार आहोत जी महिला या बिझनेसमधून महिन्याला कोट्यावधी रूपये कमावते. त्यांचे नाव आहे दीप्ती अवस्थी शर्मा. त्यांना या बिझनेसमधून १ कोटीपेक्षा जास्त रूपयांचा फायदा होतो.

त्यांनी ऑनलाईन होर्डिंग्सचा हा व्यवसाय २०१६ साली सुरू केला होता. जास्त पैसे नसल्याने त्यांनी फक्त ५० हजारांची गुंतवणूक करून दिप्ती यांनी हा बिझनेस सुरू केला होता. त्याच्या पुढच्याच वर्षी त्यांनी १२ कोटींची कमाई केली होती. त्यानंतर त्यांच्या कंपनीचा टर्नओव्हर २० कोटींपेक्षा जास्त झाला होता.

दिप्ती यांनी माहिती दिली की, अवघ्या ५० हजारात मी हा डिजीटल होर्डिंग्सचा बिझनेस सुरू केला होता. माझी ही कल्पना यशस्वी झाली आणि अगदी कमी वेळात खुप जास्त नफा मिळू लागला. मी डिजीटल होर्डिंगच्या व्यवसायाबद्दल माहिती घेण्यास सुरूवात केली.

तेव्हा माझ्या लक्षात आले की हे फिल्ड खुप अनऑर्गनाईज्ड पद्धतीने काम करते. डिजीटलायजेशन झाल्यामुळे लोकांना सर्वकाही घरबसल्या पाहिजे असते त्यामुळे मी हा व्यवसाय करण्याचे ठरवले. हे काम तुम्ही मार्केटींग आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने सुरू करू शकता.

यासाठी तुम्हाला डोमेन नावासह एक वेबसाईट तयार करावी लागेल. त्यासाठी तुम्हाला स्वताची जाहिरात करावी लागेल. सुरूवातीला हे जाणून घ्या की कुठे आणि कोणत्या प्रकारच्या जाहिराती लोकांना द्यायच्या आहेत. हे पाहून तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधू शकता.

लोकांना घरबसल्या जाहिराती हव्या असतात त्यामुळे हा व्यवसाय खुप चालतो. सर्वात आधी गो होर्डिंग्स डॉट कॉम वेबसाईटवर कस्टमरला लॉगिन करावे लागते. त्यानंतर जिथे होर्डिंग्स लावायच्या आहेत त्या ठिकाणाचे लोकेशन सर्च करून निवडावे लागते. त्यानंतर कंपनीला एक मेल जातो.

त्यानंतर कंपनीतर्फे साईट आणि लोकेशन उपलब्ध कन्फर्मेशनसाठी पाठवलं जातं. त्यानंतर कस्टमरकडून आर्टवर्क आणि ऑर्डर घेतली जाते. लोकेशन साईटवर लाईव्ह जाण्यासाठी एक आयडी आणि पासवर्ड दिला जातो. दीप्तीची कंपनी महिनाभर होर्डिंग्स लावण्यासाठी एक लाख रूपये घेते. त्यामुळे तुम्ही अंदाज लावू शकता तिचा व्यवसाय महिन्याला किती होत असेल.

Leave A Reply

Your email address will not be published.