कडक सॅल्युट! या कुटुंबातील पिढ्यान पिढ्या बजावताय पोलिस दलात सेवा

0

 

 

आज आपण अशा एका कुटुंबाबद्दल जाणून घेणार ज्या कुटुंबाच्या पिढ्यान् पिढ्या पोलिस दलात कार्यरत आहे. या कुटुंबाचे नाव आहे ओंबासे. ओंबासे कुटुंबातील तीन पिढ्यांना पोलिस दलात कार्यरत आहे.

ओंबासे कुटुंब मूळचे सोलापुरचे आहे. ओंबासे कुटुंबातील आताच्या पिढीचे संदीप, प्रविण आणि स्नुषा सोनाली सोलपूर शहरात आपले कर्तव्य बजावत आहे.

ओंबासे कुटुंब करमाळा जिल्ह्यातील वंजारवाडी येथील रहिवासी आहे. ओंबासे यांच्या कुटुंबातील शंकरराव ओंबसे हे पहिले पोलिस दलात सामील होणारे व्यक्ती होते.

त्यानंतर आपल्या वडिलांसारखेच आपणही पोलिस दलात काम करायचे अशी इच्छा बाळगत यशवंतराव यांनी आधी लष्करात तर नंतर पोलिस दलात काम करण्यास सुरुवात केली. यशवंतरावांनी पंढरपुरातून आपल्या पोलिस दलाची सेवा करण्यास सुरुवात केली होती.

पुढे त्यांनी सोलापुर, अकलूज या शहरात कार्यरत होते त्यानंतर त्यांनी निवृत्ती घेतली होती. यशवंतरावांप्रमाणेच त्यांच्या दोन्ही मुलांनी म्हणजेच मोठा मुलगा संजय आणि लहान मुलगा संदीप यांनीही पोलिस दलात काम करण्यास सुरुवात केली.

संदीप यांनी रेल्वे क्राईम अधिकारी म्हणून कल्याणमध्ये आधी ते कार्यरत होते, पण आता ते रेल्वेच्या गुप्तचर भागात वरिष्ठ पोलिस निरिक्षक म्हणून कार्यरत आहे. तर त्यांचे मोठे बंधू संजय हे पोलिस दलामध्ये सहाय्यक उपनिरिक्षक म्हणून कार्यरत होते.

संजय यांचे चार वर्षांपुर्वी अपघाती निधन झाले होते. त्यानंतर त्यांचा मुलाने पोलिस दलात आपले कर्तव्य बजावण्यास सुरुवात केली. ओंबासे कुटुंबात महिलांनी घर सांभाळण्याला प्राधान्य दिले होते. आता मात्र तिसऱ्या पिढीतल्या महिलेने पोलिस दलातील सेवेला प्राधान्य दिले आहे.

निलेश ओंबासे यांची पत्नी सोनाली या सध्या पोलिस दलात फौजदार म्हणून कार्यरत आहे. अशाप्रकारे ओंबासे कुटुंबातील पिढ्यान् पिढ्या पोलिस दलात कार्यरत राहून देशाची सेवा करत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.