डान्स केल्यानंतर घरी खावा लागायचा वडीलांचा मार पण तरीही तिने हार मानली नाही; आज आहे बॉलीवूडची टॉपची डान्सर

0

 

 

स्वत च्या अभिनय कौशल्याने इंडस्ट्रीमध्ये नाव कमवणारी कलाकार अनेक आहेत. अशीच एक कलाकार सध्या बॉलीवूडमध्ये खुप प्रसिद्ध आहे. या अभिनेत्रीचे नाव आहे नोरा फतेही. नोराने तिच्या डान्सने बॉलीवूडमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

नोराने तिच्या डान्सने प्रेक्षकांना वेडे केले आहे. नोराचा जन्म ६ फेब्रूवारी ला कॅनडामध्ये झाला. नोराचे वडील अरेबियन होते. तर आई भारतीय वंशाची होती. त्यामूळे नोराच्या घरात बॉलीवूड चित्रपटांचे क्रेझ होते. नोराला देखील बॉलीवूडचे वेडं लागले.

नोराला अभिनयात रुची निर्माण झाली होती. तिने ही गोष्ट घरच्यांना सांगितली तेव्हा तिला मार खावावा लागला होता. नोराला डान्स शिकायचा होता. पण घरच्यांनी तिला परवानगी दिली नाही. त्यामूळे नोरा बंद खोलीत डान्सची प्रॅक्टिस करायची. अनेक वर्ष तिने याच पद्धतीने डान्स शिकला.

नोराने अभिनेत्री होण्याचा निर्णय घेतला. अभिनेत्री होण्यासाठी तिने भारतात येण्याचा निर्णय घेतला. पण तिचे कुटूंब यासाठी तयार नव्हते. नोरा कॉलेजमध्ये असताना तिच्या आई वडीलांचा घटस्फोट झाला. घटस्फोटोनंतर घराची सगळी जबाबदारी नोरावर आली. त्यामूळे तिने काम करायला सुरुवात केली.

कामासोबत नोराने भारतातील मॉडेलिंग कंपनीमध्ये प्रवेशासाठी प्रयत्न सुरु केले. तिला भारतातील एका कंपनीने कामासाठी बोलावले. नोराला तिचे स्वप्न पुर्ण होताना दिसत होते. पण ते एवढ्या सहजासहजी पुर्ण होणार नव्हते. त्यासाठी तिला खुप मेहनत करावी लागणार होती.

सुरुवातीला नोराने अनेक जाहीराती केल्या. पण तिला त्या जाहीरातींसाठी पैसे मिळाले नाही. पण नोराने हार मानली नाही. तिने साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करायला सुरुवात केली. साऊथच्या अनेक चित्रपटांमध्ये नोराने स्पेशल डान्स सॉंग्स केले आहेत.

२०१५ मध्ये आलेल्या टेंपर चित्रपटामूळे नोराला खुप प्रसिद्ध मिळाली होती. त्यानंतर तिने हिंदी टेलिव्हिजनवर बिग बॉस आणि झलक दिखला आजा अशा कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला. तिच्या प्रसिद्धिमध्ये वाढ झाली. नोराला बॉलीवूडमधून ऑफर येऊ लागल्या. काहीही न करण्यापेक्षा काही तरी केलेलं चांगल म्हणून नोराने डान्सच्या ऑफर स्वीकारल्या.

नोराना खरी ओळख सत्यमेव जयते चित्रपटातील दिलबर दिलबर गाण्यामूळे मिळाली. या गाण्यामूळे नोरा घराघरात जाऊन पोहोचली. तिला फक्त भारतातच नाही तर बाहेर देशातही ओळख मिळाली. या गाण्यानंतर तिने साखी, साखी, कमरीया अशी अनेक गाणी केली. या गाण्यांमूळे ती बॉलीवूडच्या सर्वात प्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये सामील झाली.

डान्ससोबतच ती उत्तम अभिनेत्री देखील आहे. तिने स्ट्रीट डान्सर चित्रपटामध्ये काम केले आहे. पुढे ती अजून नवनवीन चित्रपटांमध्ये दिसणार आहे. सध्या इंडस्ट्रीमध्ये नोराला टक्कर देणारी कोणतीही अभिनेत्री नाही. त्यामूळे ती सध्याच्या घडीला यशस्वी अभिनेत्री आणि टॉपची डान्सर आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.