निवेदिता सराफ गेल्या ११ वर्षांपासून करत आहेत साईड बिझनेस, या मोठ्या ब्रॅंडच्या आहेत मालकीण

0

निवेदिता सराफ ह्या मराठी चित्रपटसृष्टीतील नावाजलेल्या अभिनेत्री आहेत. त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत अनेक हिट सिनेमे केले आहेत. त्यांनी १९८८ साली दे दना दन या चित्रपटातून आपले करिअर सुरू केले.

९० च्या दशकातील त्या एक खुप नावाजलेल्या अभिनेत्री आहेत. त्यांनी लक्ष्मीकांत बेर्डे, आशोक सराफ, महेश कोठारे आणि सचिन पिळगांवकर अशा दिग्गज कलाकारांसोबत काम केले आहे. त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतही काम केले आहे.

सध्या त्या चित्रपटसृष्टीतून लांब आहेत. सध्या त्या अग्गबाई सासूबाई या मालिकेत काम करत आहेत. जेव्हा त्यांनी चित्रपटसृष्टी सोडली तेव्हा त्या आपल्या आवडीचा साईड बिझनेस करत होत्या. त्यांना आधीपासूनच साड्यांची खुप आवड होती.

त्यांना साड्यांच्या नवनवीन डिझाईन्स खुप आवडायच्या. पतीचा होकार मिळताच त्यांनी साड्यांचा बिझनेस करण्यास सुरूवात केली. त्यांनी रेडिमेड साड्या घेण्यास सुरूवात केली आणि त्या साड्या विकायला सुरूवात केली.

पण त्यांच्या लक्षात आले की अनेक स्त्रियांना साडीच नेसता येत नाही. मग त्यांनी स्वताच साड्या डिझाईन करण्यास सुरूवात केली. निवेदिता यांचे म्हणणे आहे की, मी तयार केलेल्या साड्या कोणत्याही ड्रेसवर नेसता येतात.

तसेच या साड्या घालण्यासाठी फक्त ३० सेकंद लागतात. त्यांना ही कल्पना फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करताना आली. त्यांना वेगवेगळ्या साड्या घालण्याची हौस होती. त्यांना एका कार्यक्रमात आकर्षक शिवलेली साडी घालण्याची परिधान करायला मिळाली होती तेव्हा त्यांना साडीची आवड निर्माण झाली.

गेल्या १० वर्षांपासून निवेदिता सराफ हा बिझनेस करत आहेत. त्यांच्या ब्रॅंडची टॅगलाईन आहे डिझाईन सारीज ईन एफोर्डेबल रेट. कमी किंमतीत महिलांना चांगल्या दर्जाची साडी देणे हा त्यांचा उद्देश आहे.

जवळपास ५ वर्षांपासून त्या त्या स्वता डिझाईन केलेल्या साड्या विकत आहेत. त्यांच्या ब्रॅँडचे नाव आहे हंसगामिनी ठेवले आहे. त्यांना हे नाव त्यांच्या पतीने म्हणजे अशोक सराफ यांनी सुचवले होते. त्यांनी अनेक ठिकाणी आपल्या बॅंडचे प्रदर्शन ठेवले होते. त्यांच्यामुळे अनेक गरजू महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.