मानलं भावा! कॉल सेंटरवर काम करणारा नितीन ‘असा’ झाला ११ हजार कोटींचा मालक

0

 

काही लोक स्वतःवर विश्वास ठेवून नोकरी सोडून व्यवसाय करत असतात. अनेक लोक आपल्या जिद्दीवर आपला व्यवसाय यशस्वी करून दाखवतात. आजची ही अशाच एका तरुणाची आहे.

जो एकेकाळी परिस्थिती चांगली नसल्यामुळे कॉल सेंटरवर काम करत होता, पण तोच तरुण आज करोडो रुपयांच्या कंपनीचा मालक आहे. बेंगलुरूमध्ये राहणाऱ्या या तरुणाचे नाव नितीन कामथ आहे.

नितीन भारतातील सर्वात मोठ्या ब्रोकरेज कंपनी झेरोधाचे सहसंस्थापक आहे. बाह्य गुंतवणूकदारांकडून एक रुपया न घेता त्याने देशातील सर्वात मोठी स्टॉक ब्रोकिंग प्लॅटफॉर्म तयार केले आहे. त्यांची संपत्ती आज ११ हजार कोटींपेक्षा जास्त आहे.

आजजरी त्यांच्या कंपनीत ९०० लोक कामाला असले, करोडोंची प्रॉपर्टी असली तरी एकेकाळी नितीन पैसे कमावण्यासाठी कॉल सेंटरवर काम करायचे, पण आज ते त्यांच्या मेहनतीच्या आणि जिद्दीच्या बळावर यशस्वी उद्योजक बनले आहे.

२०२० मध्ये फॉर्ब्स भारताच्या सर्वात श्रीमंत लोकांच्या नितीन कामथ यांचेही नाव आहे. वेल्थ हुरून यांनी ४० वर्षांखालील सेल्फमेड श्रीमंत लोकांची यादी जाहीर केली होती. त्यायादीत १७ भारतीयांचा समावेश होता, यातही नितीन यांचा समावेश होता.

नितीन यांनी झेरोधाची सुरुवात त्यांचा भाऊ निखिल कामथ यांच्यासोबत मिळून केली होती. तसेच या व्यतिरिक्त कामथ बंधूंनी ‘टू बिकन’ ही गुंतवणूक व्यवस्थापन कंपनी स्थापन केली आहे.

सुरुवातीला व्यवसाय करण्यात नितीन यांना खूप अडचणी आल्या पण त्यांना स्वतःवर विश्वास होता. त्यामुळे त्यांनी आपल्या मेहनतीवर इतके यश मिळवले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.