नाद खुळा! २१ वर्षाच्या वयात हा मुलगा कमवतोय लाखो रुपये, फक्त त्याच्या एका भन्नाट कल्पनेमुळे

0

 

 

आजची ही गोष्ट आहे भोपाळमध्ये राहणाऱ्या निखिल जाधवची. निखिल फक्त २१ वर्षांचा असून तो इतक्या कमी वयात बाईकर्स प्राइड नावाच्या कंपनीचा संस्थापक आणि सीईओ आहे.

निखिलची कंपनी इलेक्ट्रिक आणि कस्टमाईज सायकल बनवण्याचे काम करते. २०१६ मध्ये सुरु झालेल्या या कंपनीची नेटवर्थ सध्या १ कोटी १० लाख रुपये इतके आहे. गेल्यावर्षी या कंपनीची वार्षिक उलाढाल ४० लाख रुपये इतकी झाली होती.

निखिल स्वता: एक क्रॉस कंस्ट्री सायकलिस्ट आहे. १७ वर्षाच्या वयात त्याने मुंबई-पुणे-मुंबई आणि मुंबई ते गोवा १००० किलोमीटरचा प्रवास पाच दिवसात करुन एक रेकॉर्ड केला होता.

गेल्या ३ वर्षात त्याने आतापर्यंत ३०० पेक्षा जास्त इलेक्ट्रिक सायकल तयार केल्या आहे. याच्याशिवाय देशभरात निखिलच्या १५० डिलरशिप आहे. जिथे त्याची इलेक्ट्रिक सायकल विकल्या जातात.

निखिल नववीला असताना त्याच्याकडे एक सायकल होती. एकेदिवशी तो सायकल खेळत असताना सायकलिंगचा एक प्रॉफेशलन ग्रृपने त्याला थमअप्स केले, निखिलला हे खुप भारी वाटले तो त्यांच्या मागे गेला.

तेव्हा त्याला असे कळाले की हा एक मध्य प्रदेशचा खुप मोठा सायकलिंग गृप आहे. तेव्हापासून त्याने त्यांचा गृप जॉईन केला. त्याचे गृपचे फाऊंडर सत्य प्रकाश होते, त्यांच्याकडे १०० पेक्षा जास्त सायकल होत्या, त्यासर्व त्यांनी कस्टमाईज केलेल्या होत्या.

हे बघून त्यानेही आपली सायकल कस्टमाईज करण्याचे ठरवले. त्याने सुरुवातीला स्वता:साठी एक सायकल तयार केली. त्याने तयार केलेली सायकल त्याच्या मित्रांना आणि तिथल्या जवळपास राहणाऱ्या लोकांना खुप आवडली. तर त्यांनीही निखिल समोर त्यांच्यासाठी सायकल बनवून देण्याची इच्छा व्यक्त केली.

निखिलने तयार केलेल्या सायकल लोकांना प्रचंड आवडू लागली आणि त्याला ऑर्डर मिळू लागल्या. पुढे त्याने त्याच्या याच आवडीला आपला व्यवसाय बनवला आणि त्याने स्वता:चीच कंपनीची सुरुवात केली.

निखिलने कॉमर्समधून १२ वी पास केली, त्यानंतर त्याने बीबीएसाठी एडमिशन घेतले. पण आपल्या व्यवसायामुळे त्याला कॉलेजच्या दुसऱ्या वर्षातच त्याला आपले कॉलेज सोडावे लागले होते. आज त्याच कंपनीमुळे तो महिन्याला लाखो रुपयांची कमाई करत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.