पिंपरीच्या तरुणाची आगळी-वेगळी शक्कल, आता तुम्हाला हव्या त्या ठिकाणी काढून मिळणार पंक्चर

0

 

 

कोरोनाच्या संकटात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत तर अनेकांना स्वत:चा व्यवसाय करण्याच्या कल्पना मिळाल्या आहेत. अनेकांनी तर वेगवेगळ्या समस्यांवर उपाय काढला आहे आणि त्यालाच व्यवसायमध्ये बदलले आहे.

आज आम्ही तुम्हाला अशा एका तरुणाची गोष्ट सांगणार आहोत, ज्याने कोरोनाच्या काळात एक भन्नाट शक्कल लढवली आहे. बार्शी तालुक्यातील युवक नेताजी कांबळे याने एकच कॉल पंक्चर सॉल्व्हची आयडिया लढवली आहे, ज्यामुळे त्याने आता ऑनलाईन पंक्चर सेवा सुरु केली आहे.

आता उन्हाळा आला आहे, तसेच खराब होत्या रस्त्यामुळे रस्त्यात दुचाकी आणि चारचाकी यांचे चाक पंक्चर होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नेताजीने ऑनलाईन पंक्चर दुकान नावाचा व्हॉट्सऍप ग्रुप सुरु केला आहे. त्यामुळे कोणाची गाडी पंक्चर झाल्यास लोक त्याला फोन करतात आणि तो तिथे जाऊन त्यांना सेवा देत आहे.

एकच कॉल अन् पंक्चर सॉल्व्ह असे म्हणत त्याने ही संकल्पना राबवली आहे, त्याच्या या भन्नाट कल्पनेमुळे लोकांना जागीच सेवा भेटत आहे, त्यामुळे गाडी पंक्चर झाल्यानंतरचा मोठा त्रास कमी होत आहे.

तसेच त्याच्या या कामाचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे, कारण हिंगणी धरण क्षेत्रात शेतीचे प्रमाण वाढले आहे. अशात शेती करताना ट्रॅक्टरही पंक्चर होत आहे, त्यामुळे नेताजीने काढलेल्या ऑनलाईन ग्रुममुळे तो लगेच त्या ठिकाणी जाऊन शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरचे पंक्चर काढत आहे.

नेताजीचे वडिल तसेच त्यांचे भाऊ यांनी पंक्चर काढणे, केरसुणी तयार करणे, स्टोव्ह दुरुस्ती अशा विविध प्रकारचे कामही केले आहेत, कोणतेही काम छोटे-मोठे नसते काम ते काम असते, असे या कांबळे कुटुंबियांनी दाखवून दिले आहे.

आज प्रत्येक क्षेत्रात तंत्रज्ञानाचा उपयोग केला जात आहे आणि सध्या जगासोबत पुढे जाणे गरजेचे आहे. त्यामुळे मी देखील ऑनलाईन पंक्चर दुकान नावाचा व्हॉट्सऍप ग्रुप काढला आहे, त्याच्या माध्यमातून लोकांना पंक्चरची सेवा देत आहे, असे नेताजी कांबळेने म्हटले आहे.

नांदणी, हिंगणी, मळेगाव, उपळे, घाणेगाव, साकल, पिंपळगाव, जामगाव, भोयरे, रातंजन, नरखेड अशा ठिकाणी जाऊन नेताजी कांबळे पंक्चरची सेवा देत आहे. लोकांना हव्या त्या ठिकाणी पंक्चरची सेवा मिळत असल्याने नेताजीच्या कामाची सगळीकडेच चर्चा होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.