६२ वर्षांची आजी वर्षाला विकतेय १ कोटी रुपयांपेक्षा जास्त दूध; अशिक्षित असूनही बनली अनेकांची प्रेरणा

0

कोरोनाच्या संकटात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या अशात आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेने चांगलाच जोर धरला आहे. आता गुजरातची एक ६२ वर्षीय आजी आत्मनिर्भरतेचे एक उत्तम बनली आहे.

या आजीचे नाव नवलबेन चौधरी असून त्या दूध विकून महिन्याला लाखो रुपये कमवत आहे. विशेष म्हणजे त्या अशिक्षित असून त्यांनी गेल्या वर्षात १ कोटी १० लाख रुपयांचे दूध विकले आहे. या आजी बनासकांठा जिल्ह्याच्या नगाणा गावात राहतात.

नवलबेन यांच्याकडे दूध उत्पादनासाठी गायी-म्हशी दोन्ही आहे. या आजी दूध विकून दरमहिन्याला सुमारे साडे तीन लाखांपेक्षा जास्त रुपये कमवत आहे.

नवलबेन यांच्याकडे ८० म्हशी आणि ४५ गायी आहेत. यांच्यापासून नवलबेन यांना जवळपास १ हजार लिटर दुध मिळते. त्यांना चार मुलेही आहेत, सध्या ते सर्व डीएड, बीएड करुन नोकरी करत आहे.

२०१९ मध्ये नवलबेन यांनी ८७.९५ लाख रुपयांची दूध विक्री केली आहे. त्यामुळे नवलबेन बनासकांठा जिल्ह्यात सर्वात जास्त दूध विक्री करणारी दूध विक्रेता बनली होती. अशाचप्रकारे २०२० मध्ये त्यांनी १ कोटी १० लाख रुपयांचे दूध विकून त्या पुन्हा सर्वात जास्त दूध विक्री करणाऱ्या विक्रेता बनल्या.

गेल्या दोन वर्षात नवलबेन यांना २ लक्ष्मी पुरस्कार आणि ३ बेस्ट पशुपालन पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्याकडे बघून त्यांच्या परिसरातील अनेक लोकांनी दूधाचा व्यवयाय सुरु केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.