..आणि नासाने अंतराळवीराला स्पेस सुटमध्येच लघवी करण्याची परवानगी दिली होती, वाचा पुर्ण किस्सा

0

अंतराळात अश्या बऱ्याच गोष्टी घडतात ज्या सामान्य लोकांना माहित नसतात. नासाने सामान्य लोकांपासून बऱ्याच गोष्टी लपवल्या आहेत. नासाने आतापर्यंत अंतराळात जेवढे मिशन पार केलेत त्यामध्ये अशा बऱ्याच घटना होत्या ज्या खुप कमी लोकांना माहित आहेत. त्यातलेच एक मिशन होते अपोलो. असे म्हणतात की या मिशनमध्ये अनेक रहस्यमयी घटना समोर आल्या पण त्या नासाने लपवल्या आहेत.

सुमारे ५० वर्षांपूर्वी म्हणजे 1969 मध्ये मानवाने पहिल्यांदा चंद्रावर पाऊल ठेवले. हे अमेरिकेचे अपोलो मिशन होते, जे चंद्रावर पोहोचले परंतु त्याची तयारी ६० च्या दशकापासून सुरू झाली होती. या अभियानाच्या अगोदर बरीच अंतराळवीरांना अंतराळात पाठविण्यात आले होते, जेणेकरून जागेच्या त्या पैलू ओळखता येतील ज्यामुळे हे मिशन अधिक सुलभ करण्यात मदत होईल.

अपोलो मिशनची सुरुवात १९६१ मध्ये झाली. अब्ज डॉलरचा हा प्रकल्प त्यावेळी नासाचा सर्वात महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट होता. हजारो शास्त्रज्ञ यात सामील होते. शेवटी ३३ अंतराळवीरांना प्रशिक्षण देण्यासाठी आणि चंद्रावर पाठविण्यासाठी निवडण्यात आले. यावेळी, अवकाशात वेळ घालवण्याशी संबंधित बर्‍याच गोष्टी बाहेर आल्या ज्या इतिहासात कायमच नोंदविल्या गेल्या आहेत.

आज आम्ही तुम्हाला अशाच एका कथेबद्दल सांगणार आहोत. नासाचा पहिला अंतराळवीर एलन शेपार्डने १९६१ मध्ये उड्डाण केले. त्यानंतर, सर्व अपोलो मिशनच्या अंतराळवीरांना उड्डाण करण्यापूर्वी नाश्ता देण्यात आला होता. एलन शेपार्डला कमी फायबरसह पौष्टिक आणि कॅलरीयुक्त नाश्ता देण्यात आला.

उड्डाण दरम्यान त्यांना टॉयलेटला येऊ नये किंवा शौचालयास येऊ नये म्हणून त्यांना हा हलका फुलका नाश्ता देण्यात आला होता. मिशनपूर्वी अंतराळवीरांना कॉफी घेण्यास प्रतिबंधित करण्यात आले होते. पण झाले असे की अंतराळवीरांना टॉयलेटला लागणार नाही असे अंदाज वर्तवले जात असताना सगळे उलटेच होऊन बसले.

पहिले मिशन पंधरा मिनीटांचे होते. डॉक्टरांना वाटले की एलन शेपर्ड याला इतका वेळ टॉयलेटला लागणारच नाही. पण तज्ञांकडून एक चुक झाली होती. यामध्ये काऊंटडाऊनची वेळ पकडण्यातच आली नव्हती. त्याचा परिणाम असा झाला की अंतराळात गेल्यानंतर एलनला जोरात टॉयलेटला आली होती.

त्या दिवशी जय बार्बरी अमेरिकन टीव्ही चॅनेल एनबीसीवरील मिशनची माहिती देत होते. त्यांनी सांगितले की ,तो दिवस मला अजूनही आठवतो. त्यांनी कॅप्सूलमध्ये रॉकेटच्या टोकाला अ‍ॅलन शेपर्ड याला बसवले होते. पण एलनसाठी शौचालयासाठी कोणतीही व्यवस्था करण्यात आली नव्हती.

दोन तासांनंतर एलन यांनी वारंवार मिशन कंट्रोलकडून लघवी करण्यासाठी परवानगी मागितली. अखेर, नासाच्या बाकीच्या अंतराळवीरांनी त्यांना आपल्या कपड्यातच लघवी करण्याची परवानगी दिली. परंतु असे केल्यावर त्याच्या स्पेस सूटच्या वैद्यकीय सेन्सर्सचे नुकसान झाले होते. स्पेस सुट खुप महाग असतो. एका स्पेस सुटची किंमत करोडोच्या घरात असते. आणि एलन यांनी त्यातच लघवी केली होती.

या प्रसंगानंतर अंतराळात अंतराळवीराच्या टॉयलेटची सुविधा करण्यात आली. ही पहिलीच घटना होती ज्यामुळे नासाला वाटले की आपण याबाबत विचार केला पाहिजे. नंतर यावर तोडगा काढण्यात आला. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कळवा. जर ही माहिती आवडली असेल तर पुढे पाठवायला विसरू नका.

Leave A Reply

Your email address will not be published.