एकेकाळी होता कर्जबाजारी, ‘ह्या’ भन्नाट प्रयोगातून लाखो कमवत दिला ३० जणांना रोज़गार

0

 

 

राज्यातील अनेक शेतकरी व्यवसायसोबतच अनेक नवनवीन वाटेवर जात असतात, तसेच त्या व्यवसायात वेगवेगळे प्रयोग करुन आपले नशीब आजमावत असतात. आज आम्ही तुम्हाला अशा माणसाची गोष्ट सांगणार आहोत ज्याने शेतीकडून आपले लक्ष नर्सरीकडे वळवले आणि या नर्सरीतून तो लाखोंची कमाई करत आहे.

भंडाऱ्यात राहणाऱ्या या शेतकऱ्याचे नाव राजू भोयर असे आहे. त्यांनी आपल्या नर्सरीचा व्यवसाय अर्ध्या एकर जमिनीतून सुरु केला होता पण आता तीच नर्सरी त्यांनी ७ एकरपर्यंत वाढवली आहे.

या नर्सरीची सुरुवात त्यांनी सात वर्षांपुर्वी केली होती, आता त्यांच्या या नर्सरीचा विस्तार चांगलाच झाला आहे. ते वर्षाला २० लाखांचे उत्पन्न घेत असून खर्च वजा होऊन ते एका वर्षाला १० लाखांची कमाई करत आहे.

भंडारा जिल्ह्याच्या पालोरा गावात ते राहतात. तिथेच त्यांची वडिलोपार्जित अर्धा एकर शेती होती. त्यांनी सुरुवातीला शेती केली पण त्यासाठी त्यांना कर्ज घ्यावे लागले होते आणि पारंपारिक शेतीतून त्यांच्या लागवडीचा खर्चही निघत नव्हता. त्यामुळे त्यांनी नर्सरी सुरु करण्याचा निर्णय घेतला.

सावकाराचे डोक्यावर असणारे कर्ज कमी करण्यासाठी त्यांनी अर्ध्या एकरावरच नर्सरी सुरु केली. ही नर्सरी होती फुल झाडांची ओम रोज नर्सरी. त्यांनी सुरुवातीला शहरात जाऊन त्या रोपट्यांची विक्री सुरु केली.

सुरुवातीला त्यांना हा व्यवसाय करण्यात खुप अडचणी आल्या पण त्यांनी काम सोडले नाही, त्यांनी शहरात जाऊन ही रोपटी विकण्यास सुरुवात केली. या नर्सरीतून त्यांना चांगलाच फायदा होऊ लागल्याने त्यांनी ही नर्सरी सात एकरापर्यंत वाढवली आहे.

भोयर यांच्या नर्सरीत आता ५० प्रकारची वेगवेगळी झाडे आहे. ते या रोपट्यांची विक्री आंध्रप्रदेश, पश्चिम बंगालसारख्या वेगवेगळ्या राज्यात करत आहे. त्यांनी त्यांच्या नर्सरीमध्ये ३० जणांना रोजगारही दिला आहे.

भोयर दरवर्षी त्यांच्या या नर्सरीचा विस्तार करत असतात. या नर्सरीत त्यांच्या कुटुंबातील सदस्यही काम करतात. शेती करताना अनेकांना ती परवडत नसल्याचे शेतकरी म्हणत असतात, पण तुम्ही शेती करताना योग्य नियोजन केले तर त्यातून सुद्धा तुम्ही चांगले उत्पन्न मिळवू शकतात, असे भोयर यांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.