आईचे दागिने गहाण ठेऊन कंपनी सुरू केलेला माणूस नंतर झाला १० हजार करोडच्या कंपनीचा मालक; पण आता..

0

आज आम्ही तुम्हाला एकेकाळी भारतातील सगळ्यात मोठी एअरवेज कंपनी असलेल्या जेट एअरवेज कंपनीबद्दल माहिती सांगाणार आहोत. नरेश गोयल यांनी खुप संघर्ष करून ही कंपनी स्थापन केली होती. जरी त्यांची भागिदारी आता त्या कंपनीत जास्त नसली तरी त्यांनी या कंपनीला सुरू करण्यासाठी खुप कष्ट घेतले होते. त्यानंतर त्यांनी अनेक चढउतार पाहिले आहेत.

जेट एअरवेजचे अध्यक्ष नरेश गोयल यांनी अत्यंत कठीण परिस्थितीत आईच्या दागिन्यांची विक्री करुन ट्रॅव्हल एजन्सी सुरू केली होती. नरेश गोयल यांनी १९६७ मध्ये आईच्या काकाच्या एजन्सीमध्ये रोखपाल म्हणून काम करण्यास सुरवात केली होती.

मग त्यांना तिथे ३०० रुपयांचा पगार मिळायचा. येथे काम करत असताना त्यांना रॉयल जॉर्डन एअरलाइन्ससारख्या बर्‍याच मोठ्या कंपन्यांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. १९७४ मध्ये त्यांनी आपली एक ट्रॅव्हल एजन्सी सुरू केली आणि त्यास जेट एअरवेज असे नाव दिले.

प्रवासी एजन्सी सुरू करण्यासाठी त्याच्याकडे पैसे नव्हते. त्यांनी याबाबत आपल्या आईशी चर्चा केली. त्यावेळी त्यांच्या आईने त्यांना सगळे दागिने काढून दिले आणि ते विकून टाकायला सांगितले. त्यातून गोयल यांना १५ हजार रूपये मिळाले होते.

त्या पैशातील १० हजारातून त्यांनी एक ट्राव्हेल एजेन्सी सुरू केली आणि त्याला नाव दिले जेट एअरवेज. १९९१ नंतर जेट एअरवेजचा मार्ग मोकळा झाला. जेव्हा भारत सरकारने ओपन स्काई पॉलिसीला ग्रीन सिग्नल दिला आणि नरेश गोयल यांनी या संधीचा फायदा घेत १९९३ मध्ये घरगुती ऑपरेशनसाठी जेट एअरवेज सुरू केली.

कंपनीने आपले कामकाज चालूच ठेवले. एक काळ असा होता की ही कंपनी देशात अव्वल स्थानी होती. त्यावेळी नरेश गोयल देशातील २० श्रीमंत व्यक्तींपैकी होते. पण आता कंपनीची अवस्था वाईट आहे.

जेट एअरवेजच्या विमान कंपनीला चालना देण्यासाठी नॅशनल इन्व्हेसटमेंट ऍड इन्फ्रा फंड यांनी जेट एअरवेजमध्ये ३४०० करोड रूपये गुंतवले होते. त्यानंतर बॅंक जेटचे सर्वात मोठे भागिदार बनले होते. आता जेट एअरवेजवर बॅंकांचे सगळ्यात जास्त वर्चस्व आहे.

या गुंतवणूकीनंतर नरेश गोयल यांचे जेटवरील व्यवस्थापन नियंत्रण कमी झाले होते आणि एअरलाइन्समधील त्यांचा हिस्सा ५१ टक्क्यांवरून २० टक्क्यांपर्यंत खाली आला होता. जेटमध्ये बँकांच्या कन्सोर्टियमचा जास्तीत जास्त ३२ टक्के हिस्सा आहे.

इतिहाडचा सुमारे २५ टक्के आणि एनआयआयएफचा १९.५० टक्के हिस्सा जेट एअरवेजमध्ये आहे. गोयल यांनी एप्रिल १९९३ मध्ये ही विमानसेवा सुरू केलील होती. पण नंतर कंपनीवर खुप कर्ज वाढू लागले. कंपनी तोट्यात गेली.

कंपनीवर बॅंकेचे खुप मोठे कर्ज आहे. २०१९ मध्ये जेट एअरवेजचे संस्थापक गोयल यांच्या हातातून कंपनीचे पद काढून घेण्यात आले होते. जेट एअरवेजवर बॅंकेचे ८ हजार २०० कोटींपेक्षा जास्तीचे कर्ज आहे.

पण गोयल यांनी ज्या प्रकारे कंपनी सुरू केली हा प्रवास खुपच प्रेरणादायी आहे. जेट एअरवेज ऐकेकाळी यशाच्या शिखरावर होती पण नशीब बदलायला वेळ लागत नाही. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कळवा. जर ही माहिती आवडली असेल तर पुढे पाठवायला विसरू नका.

Leave A Reply

Your email address will not be published.