कोरोनाच्या संकटात घरी बसून केला भन्नाट प्रयोग, आता व्यवसाय सुरु करुन कमवतोय लाखो रुपये

0

 

कोरोनाच्या संकटात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, त्यामुळे अनेक लोक यामुळे दुखी होत आहे, तर याच गोष्टीला संधी समजून काही लोकांनी स्वता:चा व्यवसाय सुरु केला आहे. विशेष म्हणजे व्यवसाय फक्त सुरुच केला नाही, तर ते करत असलेल्या नोकरीपेक्षा जास्त पैसे ते व्यवसाय करुन कमवताना दिसून येत आहे.

आजची गोष्ट अशाच एका तरुणाची आहे, ज्याची लॉकडॉऊनमध्ये नोकरी गेली पण हार न मानता, त्याने स्वता:चा व्यवसाय सुरु केला आणि त्या व्यवसायातून तो लाखोंची कमाई करत आहे. या तरुणाचे नाव नरेन सराफ असे आहे.

२३ वर्षीय नरेन हा जम्मुचा राहणार आहे. त्याने हॉटेल मॅनेजमेंटचा कॉर्स केला आहे. त्याला ताज हॉटेलमध्ये काम करायचे होते. त्यासाठी त्याची निवड सुद्धा झाली होती पण कोरोनाच्या संकटामुळे त्याला त्याची नोकरी गमवावी लागली.

नोकरी नसल्यामुळे तो घरीच बसलेला होता, तेव्हा त्याला आयडिया आली आणि त्याने घरीच वेगवेगळे पदार्थ बनवण्याचा प्रयोग सुरु केला. त्याने व्हेज-नॉन व्हेजच्या वेगवेगळ्या रेसिपी बनवल्या आणि आपल्या नातेवाईकांना टेस्ट करण्यासाठी दिल्या. तेव्हा त्याने बनवलेले पदार्थ नातेवाईकांना खुप आवडले.

त्याच्या रेसिपीला मिळालेल्या चांगल्या प्रतिसादामुळे त्याने रेस्टॉरंट सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्याने आऊट ऑफ द बॉक्स नावाने एक रेस्टॉरंट सुरु केले. त्याने नेहमी खाण्याच्या टेस्टकडे लक्ष दिले. तसेच त्याने एक स्पेशल मेन्यु तयार केला.

मेन्युमध्ये इंडियन व्हेज नॉन-व्हेज, साऊथ इंडियन, गाली स्टाईल फिश आणि किमा राजमा सारखे पदार्थ तयार करण्यास सुरुवात केली. तसेच तरुणांना आकर्षित करण्यासाठी बर्गर आणि काबली बनवण्यास सुरुवात केली.

त्याने नोव्हेंबर २०२० मध्ये त्याच्या या व्यवसायाची सुरुवात केली होती, पण खुप कमी वेळात त्याच्या रेस्टॉरंटने चांगलीच ओळख निर्माण केली आहे. त्याने त्याच्या रेस्टॉरंटची मार्केटींग करण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्याच्या रेस्टॉरंटमध्ये ग्राहकांची संख्याही वाढली.

तसेच त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून ऑर्डर घेण्यास सुरुवात केली. अशाप्रकारे तो महिन्याला लाखो रुपयांची कमाई करत आहे. लॉकडाऊनमध्ये नोकरी गेली तरी त्याने हिंमत न हारता त्याने व्यवसाय सुरु केला आणि त्यात तो लाखोंची कमाई करत असल्याने अनेकांसाठी तो आता प्रेरणादायी ठरत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.