जिरेनियमची शेती पारंपारिक शेतीवर पडली भारी, ५० हजारांच्या गुंतवणूकीत लाखोंची कमाई

0

 

आज काल युवा वर्ग मोठ्याप्रमाणात शेतीकडे वळला आहे. युवा शेतकरी शेतात वेगवेगळे प्रयोग करुन लाखो रुपयांची कमाई करत आहे. आजची गोष्ट पण अशाच दोन शेतकऱ्याची आहे जो जिरेनियमची शेती करुन लाखो रुपयांची कमाई करत आहे.

नांदेड जिल्ह्यात राहणाऱ्या या दोन शेतकऱ्याचे नाव शंकर गवळी आणि माधव गवळी असे आहे. हे दोन्ही शेतकरी जिरेनियमची शेती करुन वर्षाला ४ ते ५ लाख रुपयांची कमाई करत आहे. पारंपारिक शेतीपासून काहीतरी वेगळा प्रयोग करण्याचा त्यांचा निर्णय चांगलाच यशस्वी झाला आहे.

या दोन्ही भावांनी जिरेनियमची शेती केली आहे. जिरेनियम म्हणजेच सुगंधी वनस्पती. भारतात जिरेनियमला मोठ्याप्रमाणात मागणी आहे. विशेष म्हणजे हे पीक भारतात सहज पिकते असे असातानाही भारतात या पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जात नाही.

जिरेनियमचे रोप फक्त सहा रुपयाला मिळते. रोप लागवडीनंतर चार ते पाच महिन्यातच या रोपाची कापणी केली जाते. या शेतीसाठी मराठवाड्यातील वातावरण चांगले असल्याचे दोन्ही भावांनी म्हटले आहे. एकरी ५० हजार रुपयांचा खर्च या लागवडीसाठी येतो.

या उत्पन्नातून एका किलोला १२ हजार रुपये मिळतात, तसेच जर मुंबईच्या कंपन्यांशी करार केला, तर चांगले उत्पन्न मिळते असेही दोन्ही भावांनी म्हटले आहे. पारंपारिक शेतीपेक्षा जिरेनियमच्या शेतीत चांगले उत्पन्न मिळत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

जिरेनियमच्या पानांपासून तेल काढले जाते. या तेलाला १२ ते १४ हजार रुपये भाव आहे. एकरी १० ते १५ किलोचे उत्पादन करता येते. या शेतीतून जवळपास दोन लाखांचे उत्पन्न मिळते.

या तेलाचे वापर करुन सुंगधी साबन, अत्तर, अगरबत्ती, बनवण्यासाठी केला जातो. सध्या बाजारातील मागणी पाहता जिरेनियमची शेती हा शेतकऱ्यासाठी एक उत्तम पर्याय आहे, तसेच हा पारंपारिक शेतीपेक्षा जास्त खर्चिकही नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.