१० हजार रुपये गुंतवणूक करून हा पठ्ठ्या ‘असे’ कमवतोय महिन्याला लाखो रुपये…

0

 

 

अनेक तरुणांना व्यवसाय करण्याची इच्छा असते, त्यामुळे अनेक तरुण आपल्या हाताची नोकरी सोडून व्यवसाय क्षेत्रात उतरतात आणि व्यवसाय सुरू करतात, पण व्यवसाय करता न आल्यामुळे त्यांना चांगलेच नुकसान होते.

अशात जर तुमची कल्पना जर भन्नाट असेल तर तुम्ही तुमच्या व्यवसायात नक्कीच यशस्वी होतात. आजची ही गोष्ट अशा एका तरुणाची आहे, ज्याने आपल्या भन्नाट आयडियाने महिन्याला १० हजार रुपये गुंतवून महिन्याला लाख रुपये कमवत आहे.

कर्नाटकमधल्या या तरुणाचे नाव महेश कुमार असे आहे. हा तरुण महिन्याला १० हजार रुपयांची गुंतवणूक करून १ लाख रुपये उत्पन्न घेत आहे. विशेष म्हणजे ही गुंतवणूक कोणत्या वेगळ्या व्यवसायात नाही तर शेतीत आहे. शेती म्हणजे मशरूमची शेती.

महेश आधी नोकरी करत होता. पण त्याचे त्यात मन लागत नव्हते. त्याला व्यवसाय करण्याची इच्छा होती. तसेच नोकरीमुळे कुटुंबाला वेळ देता येत नव्हता. त्यामुळे नोकरी सोडण्याचा विचार त्याने पक्का केला. विशेष म्हणजे गाडी, घर, वार्षिक पगार पण चांगला होता तरी त्याने २०१६ नोकरी सोडली.

महेशने शेती करण्याचे ठरवले. शेतीत अजून पण वेगवेगळे प्रयोग करता येतात. लहानपणापासूनच महेशची बागायती शेती होती. त्यामुळे त्याने भरपूर रिसर्च केली आणि मशरूमची शेती करण्याचे ठरवले.

मशरूम कोणत्याही प्रकारच्या वातावरणात वाढतात. तसेच त्याला पाणी कमी असले तरी मशरूम वाढते.  शिवाय आंध्रप्रदेशात  मशरूमचे उत्पादन घेतले जात नाही. तिथे फक्त बटन मशरूम मशरूम असल्याने फक्त त्याचेच उत्पादन घेतले जाते.

त्यामुळे महेशने बटन मशरूम व्यतिरिक्त मशरूमचे उत्पादन घेण्याचे ठरवले. मिल्की मशरूम आणि ऑईस्टर मशरूम, यांची लागवड निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी हैद्राबाद आणि बंगळुरूच्या इन्स्टिट्यूटमधून ट्रेनिंग सेशन लागवडीसाठी लागणारी माहिती घेतली.

महेशने १० हजार रुपये गुंतवणूक करून बंगळुरू इन्स्टिट्यूटमधून ऑईस्टर बिया, पॅडी मशरूमच्या स्ट्रॉ आणि लोकल मार्केटमधून खोलीमध्ये दमटपणा निर्माण करण्यासाठी ह्यूमिडीफायर घेतले.

महिन्याभरात महेश यांनी ५० ते ६० किलोच्या ऑईस्टर आणि मिल्की मशरूमचे उत्पादन घेतले, सुरुवातीला जेव्हा महेशने विकण्यास सुरुवात केली. तेव्हा त्याला अपयश आले. त्यामुळे त्यांनी आपल्या मशरूमची मार्केटिंग करण्यास सुरुवात केली. व्हिडीओ बनवून पॅम्प्लेट बनवून मार्केटिंग करण्यास सुरुवात केली.

तेव्हा स्टोअर मालकांनी मशरूम घेण्यास होकार दिला, पण एक अट ठेवली जोपर्यंत जनतेचा प्रतिसाद चांगला मिळणार नाही तोपर्यंत पैसे मिळणार नाही. त्यामुळे महेशने जवळपास पाच लाख मशरूम विकले. पण अखेर त्याला यात यश मिळाले.

२०१८ पर्यंत त्याचे मशरूममध्ये आंध्रप्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणात पसरले. स्वस्तिक मशरूम नावाने त्याने आपली कंपनी सुरू केली. त्याला महिन्याभरात लाख रुपये फायदा होऊ लागला.

इतकेच नाही तर त्याने मशरूमचे बायप्रॉडक्ट सुद्धा त्याने सुरू केले. त्यामुळे त्याने मशरूमचे लोणचे, सूप पावडर, नूडल्स बनवण्यात पण सुरुवात केली. त्यामुळे महेश १० हजार रुपयांच्या गुंतवणुकीवर आज महिन्याला लाखो रुपये कमवत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.