नाद खुळा! बघा मुंबईचा पठ्ठ्या समोसे विकून कसे कमवतोय महिन्याला लाखो रुपये

0

 

गुगलसारख्या मल्टिनॅशनल कंपनीत काम करण्याचे अनेकांचे स्वप्न असते, पण जर गुगलची नोकरी सोडून एका तरुणाने समोसे विकण्याचा व्यवसाय सुरु केला आहे, असे तुम्हाला सांगितले तर तुम्हाला नक्कीच विश्वास बसणार नाही, पण हे खरं आहे.

आज आम्ही तुम्हाला अशाच एका तरुणाची गोष्ट सांगणार आहोत ज्या तरुणाने गुगलची नोकरी समोसे विकण्यास सुरुवात केली आहे आणि आता तो त्याच व्यवसायातून लाखोंची कमाई करत आहे.

मुंबईत राहणाऱ्या या तरुणाचे नाव मुनाफ कपाडीया असे आहे. मुनाफ आधी गुगलमध्ये अकाऊंट रजिस्ट्रेशनचे काम कारायचा. सुरुवातीला तो आधी मसुरीमध्ये काम करायचा, त्यानंतर त्याचे ट्रान्सफर हैद्राबाद आणि मुंबईला झाले.

मुंबईला आल्यावर त्याने नोकरी करत टीबीके नावाच्या कंपनीपासून डिलिव्हरी किचनची सुरुवात केली. इथून त्याने आपल्या आईने तयार केलेले पदार्थ विकण्यास सुरुवात केली. त्याच्या आईने तयार केलेल्या पदार्थांना चांगला प्रतिसाद मिळाला.

लोकांना पदार्थ आवडत होते पण व्यवसाय वाढवण्यासाठी जेवढ्या ऑर्डर्स मिळणे गरजेच्या होत्या तितक्या त्या मिळत नव्हत्या. इतक्यात त्याला फॉर्ब्स इंडीयाकडून एक फोन आला तेव्हा त्याला असे कळले की फॉर्ब्सच्या अंडर ३० मध्ये त्याची निवड करण्यात आली आहे. तेव्हा त्याला स्वता: वर पुर्ण विश्वास बसला.

२०१९ मध्ये मुनाफने मुंबईच्या वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या ब्रँचेस उघडल्या. मुनाफची कंपनी समोस्यासोबतच आणखी वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ तयार करते, त्यात मटन समोसा, नरगिस कबाब, डब्बा गोश्त हे काही लोकाचे आवडते पदार्थ आहे.

मेहनत घेण्याची तयारी असेल आणि आपल्या व्यवसायाला पुढे नेण्याची जिद्द जर माणसात असेल, तर माणूस नक्कीच एकेदिवशी यशस्वी होतो, हे मुनाफने सिद्ध करुन दाखवले आहे. मुनाफ अनेक तरुण-तरुणींसाठी आता प्रेरणादायी ठरत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.