खाकीतला देवमाणूस! २० वर्षांच्या कारकिर्दीत केलेत १ लाखांपेक्षा जास्त बेवारस मृदेहांवर अंत्यसंस्कार

0

 

कोरोनाच्या संक्रमणामुळे अनेकांनी आपले जीव गमावले आहे. कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर तर अनेकांना मुखाग्नी द्यायला सुद्धा कोणी नव्हते, त्यावेळी अनेक डॉक्टरांनी, पोलीस कर्मचाऱ्यांनी त्या लोकांना मुखाग्नी दिली.

आज आम्ही तुम्हाला अशा खाकीतल्या देवाची गोष्ट सांगणार आहोत, ज्या पोलिसाने आपल्या कारकिर्दीत १ लाख पेक्षा जास्त मृतदेहांना मुखाग्नी दिल्या आहे. मुंबई पोलीस दलातील अंमलदार ज्ञानदेव वारे यांच्या या सेवेला २० वर्षे पूर्ण झाली आहेत.

कधी मुलगा, तर कधी भाऊ बनून त्यांनी १ लाखांपेक्षा जास्त मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले आहे. तसेच कोरोनाच्या काळात सुद्धा त्यांनी ५०० बेवारस मृतदेहांना मुखाग्नी दिली आहे.

सध्या ज्ञानदेव वारे चेंबूरमध्ये पत्नी आणि दोन मुलांसह राहतात. त्यांची पोलीस दलातील कारकीर्द १९९५ मध्ये सुरू झाली होती. सुरुवातीला पोलीस ठाण्यात त्यांनी सेवा बजावली. त्यांनंतर २००० मध्ये त्यांना शवाहिणी चालकाची जबाबदारी सोपविण्यात आली.

ही जबाबदारी सांभाळताना त्यांना सुरुवातीला अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. भीती वाटत होती, झोप लागायची नाही, स्वप्न पडले तर त्यात सुद्धा मृतदेहच दिसायची. पण त्यांनी आपल्या जबाबदारीपासून माघार घेतली नाही, ही सुद्धा आपली जबाबदारी आहे असे म्हणत त्यांनी कामास सुरुवात केली.

आज २० वर्षानंतर सुद्धा ते आपले कर्तव्य पार पाडत आहे. हिंदू मृतदेहाला हिंदू धर्मानुसार आणि मुस्लिम मृतदेहाला मुस्लिम धर्मानुसार अंत्यसंस्कार ते करत आहे. ते दिवसाआड ५ ते ६ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करत असतात.

Leave A Reply

Your email address will not be published.