..त्यावेळी मुकेश अंबानींनी सिग्नलवरच गाडी थांबवून नीता अंबानींना घातली होती लग्नाची मागणी

0

जगातील सर्वात श्रीमंत महिलांमध्ये नीता अंबानी यांचा समावेश आहे. त्यांचे पती मुकेश अंबानी हे भारतातील सर्वात प्रसिद्ध आणि श्रीमंत उद्योगपती आहेत. आज आम्ही नीता अंबानी यांच्याबद्दल काही तुम्हाला माहित नसलेल्या गोष्टी सांगणार आहोत.

नीता अंबानी एका सामान्य कुटुंबात जन्माला आल्या होत्या. ५ वर्षांत भारत नाट्यम शिकलेल्या नीता अंबानी यांची आई एक डांसर होती आणि लहान भाऊ गायक होता. भरता नाट्यम शिकणारी नीता बर्‍याच स्टेज शोमध्ये भाग घ्यायच्या आणि त्यानंतर धीरूभाई अंबानी यांना त्या सुन म्हणून आवडल्या.

धीरूभाई अंबानी आपल्या पत्नीसमवेत एका कार्यक्रमात गेले होते तेथे त्यांनी नीताचे भारत नाट्यम नृत्य पाहिले. आणि त्या नृत्याने दोघे इतके प्रभावित झाले की त्यांनी निताला आपल्या घराची सून बनवायचे ठरवले. जेव्हा नीता त्यांचा कार्यक्रम करून घरी परत आल्या तेव्हा धीरूभाईंनी त्यांना फोन करून घरी बोलावले.

पण नीता यांना वाटले की कोणीतरी आपल्याशी मस्करी करत आहे त्यामुळे त्यांनी रागाच्या भरात फोन ठेऊन दिला होता. शेवटी तिसर्‍यांदा नीताला त्यांना फोन केला आणि नंतर नीता घरी येण्यासाठी तयार झाल्या होत्या. मुकेश अंबानीशी जेव्हा नीता यांचे लग्न मुकेश अंबानी यांच्याशी जुळले होते तेव्हा नीता अंबानी एका शाळेत शिक्षिका होत्या.

मुकेशसमोर त्यांनी एकच अट ठेवली होती की लग्नानंतरही नोकरी सोडायला सांगणार नाही. नीता आणि मुकेश हे अनेकदा एकमेकांना भेटायचे. अशा परिस्थितीत रेड लाईटवर मुकेशने गाडी थांबवली आणि ‘माझ्याशी लग्न कर’ असे विचारले तेव्हा ते दोघे सिग्नलवर गाडी लावून उभे होते.

नीताचा प्रतिसाद न मिळाल्यामुळे मुकेशने गाडी जागेवरच थांबवली होती. सिग्नल उघडला होता आणि कित्येक वाहने मागून हॉर्न वाजवत होते, पण मुकेश नीताच्या होची वाट पाहात होते. शेवटी नीता यांनी त्यांना गाडी चालवण्याची विनंती केली आणि त्या म्हणाल्या, ‘हो, मी तुमच्याशी लग्न करीन.

नीता ह्या एका सामान्य घरातून आल्या होत्या आणि मुकेश यांनी हे जीवन जवळून पहावे अशी त्यांची इच्छा होती. एके दिवशी नीता यांनी मुकेश यांना सांगितले की तुला जर खरंच माझ्याशी लग्न करायचं असेल तर माझ्याबरोबर मुंबईच्या बीएसटी बसमध्ये प्रवास करा.

मुकेश यांनी सहमती दर्शवली आणि दोघांनी डबल डेकर बसमध्ये एकत्र प्रवास केला. नंतर त्या दोघांचे लग्न झाले. नीता अंबानी आपल्या दिवसाची सुरुवात 3 लाखाच्या चहाने करतात. एका मुलाखतीत त्यांनी सांगितले होते की त्या जपानच्या सर्वात जुन्या क्रोकरी ब्रँड नोरिटेकच्या कपमध्ये चहा पितात.

नॉरिटेक क्रॉकरी सोन्याने भरली आहे आणि त्याच्या 50 कपांच्या सेटची किंमत 1.5 कोटी आहे. म्हणजेच एका कप चहाची किंमत तीन लाख रुपये आहे. निता अंबानी यांना सँडल आणि शूज खूप आवडतात. एका इंग्रजी वृत्तपत्राच्या म्हणण्यानुसार, नीता अंबानी कधीही एकदा वापरलेला शुज परत वापरत नाहीत.

त्यांच्याकडे पेड्रो, गार्सिया, जिमी चू, पेल्मोरा, मार्लिन ब्रँडचे शूज आणि सँडल आहेत. या सर्व ब्रँडच्या शूजची किंमत एक लाख रुपये किंवा त्याहून अधिक आहे. नीता अंबानी फॅशन आयकॉन म्हणून ओळखल्या जातात. रिलायन्स इंडस्ट्रीज समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पीरामल नथवाणी यांच्या मुलाच्या लग्नात नीता अंबानी यांनी ४० लाखांची डिझायनर साडी परिधान केली होती, ज्याला ‘गिनीज रेकॉर्ड बुक’ मध्ये स्थान मिळालं आहे.

ही साडी चेन्नईच्या कांचीपुरमच्या कुशल ३६ महिला कारागीरांनी बनविली होती. या साडीचे वजन आठ किलो होते. या साडीला तयार करण्यासाठी पुर्ण १ वर्ष वेळ लागला होता. नीता अंबानींच्या बॅगवर हिरे एम्बेड केलेले आहेत. चॅनेल, गोयार्ड आणि जिमी चू, कॅरी यांसारख्या जगातील सर्वात महागड्या ब्रँडच्या हँडबॅग्जचा त्यांच्या संग्रहात समावेश आहे.

बर्‍याच प्रसंगी नीता जुडिथ लीबरच्या गेनिश क्लचसोबत दिसल्या आहेत. या लहान आकाराच्या क्लचवर हिरे आणि मोती जडलेले असतात. त्यांच्या किंमती ३ ते ४ लाख रुपयांपासून सुरू होतात. तर अशी आहे निता अंबानी यांची लाईफस्टाईल. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कळवा. जर ही माहिती आवडली असेल तर पुढे पाठवायला विसरू नका.

Leave A Reply

Your email address will not be published.