एमपीएससी पास तरुणी करतेय कोकणात शेती; नवनवीन प्रयोगातून लाखोंची उलाढाल https://tumchigosht.com/success-story-of-women-farmer/

0

 

पुरुषांसोबतच आता महिलाही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून व्यवसाय करताना आपल्या आता दिसून येत आहे. यात अनेक दिग्गज महिलांनी छोट्या व्यवसाय पासून सुरुवात करून मोठमोठ्या कंपन्यांपर्यंत त्यांचा व्यवसाय वाढला आहे.

अशीच एक महिला आहे, ती म्हणजे नीता अडप्पा. मुंबईमध्ये वाढलेल्या नीता यांनी सहा महिने काम करून फार्मा कंपनी सोडू  दिली. नीता यांची स्वप्न वेगळीच होती. त्यांना काहीतरी वेगळे करायचे होते आणि त्याची जिद्दही नीता यांच्यात होती.

नीता यांचे स्वप्न पूर्ण होण्याची खरी सुरुवात तेव्हा झाली जेव्हा   त्यांनी लग्न करून बेंगलोरला जाण्याचे ठरवले. तिथे त्यांची भेट कॉलेजमधल्या, अनिशा देसाईशी झाली. दोघींनी मिळून २३ वर्षांपूर्वी एक १० हजार रुपयांनी एक व्यवसायास सुरुवात केली.

सुरुवातीला कर्जावर चालणार हा व्यवसाय आज ‘प्रकृती हर्बल’ नावाची मोठी कंपनी बनून उभा आहे. इतकेच नाही तर ही कंपनी आज हॉटेल आणि मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये १० हजार हर्बल किट सप्लाय करत आहे. तसेच ऑनलाइन माध्यमातून ५ हजार वेगवेगळे प्रकारचे प्रॉडक्ट ग्राहकांपर्यंत पोहचवत आहे.

मुंबईत १९९२ मध्ये आपले शिक्षण पूर्ण करून नीता त्यांनी एका फार्मा कंपनीला जॉईन केले होते. मात्र सहा महिन्यातच त्यांनी या कंपनीला राजीनामा दिला.  त्यानंतर त्यांनी लग्न केले आणि बेंगलोरला त्या स्थायिक झाल्या.  नीता यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा होता, त्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू होते.

एकदा एका ब्युटी प्रॉडक्टमुळे त्यांच्या स्किनवर वाईट परिणाम झाला होता. त्यावरूनच त्यांना या ‘प्रकृती हर्बल’ची कल्पना सुचली. बंगळुरूत असतानाच त्यांना असे कळले की त्यांची अनिशा देसाई या ज्युनियर देखील बेंगलोरमध्येच राहत आहे. त्यानंतर नीता यांनी अनिशा यांच्याशी संपर्क साधला आणि हर्बल प्रॉडक्ट बनवण्यास सुरुवात केली.

सुरुवातीचे दोन वर्षे त्यांनी एलोव्हेरा मॉश्चराईझर आणि शाम्पूचे वेगवेगळे सॅम्पल बनवले. त्यानंतर १९९४ मध्ये त्यांनी आपल्या कंपनीला लाँच केले. अडचणी समोर होत्या पण नीता यांची उंच भरारी घेण्याची जिद्दही त्यांच्या सोबत होती.

सुरुवातीला त्यांच्याकडे ग्राहकांची कमी होती. तसेच त्यांच्याकडे आपल्या प्रॉडक्टच्या मार्केटिंगचा अनुभवही नव्हता. मग त्यावर त्यांनी एक उपाय केला. थेट मोठ्या ग्राहकांना न भेटता ब्युटी पार्लरमध्ये आपल्या प्रॉडक्टचे सॅम्पल देण्यास सुरुवात केली. याचे सकारात्मक परिणाम त्यांना दिसायला लागले, यामुळे त्यांना मोठमोठ्या ऑर्डर्सदेखील यायला लागल्या.

पुढे जाऊन २००० या वर्षात त्यांनी आपल्या प्रॉडक्टमध्ये आणखी व्हरायटी आणली. ज्यात शॉवरमध्ये वापरले जाणारे प्रॉडक्ट, कंगवा, तेल यांसारख्या १८ प्रॉडक्टचे किट त्यांनी बनवले आणि त्यांची मोठमोठ्या हॉटेल्समध्ये विक्री सुरू केली.

काही वर्षांनी अनिशा यांना बेंगलोर सोडावे लागले. तेव्हा नीता या आपल्या व्यवसायात एकट्याच पडल्या होत्या. त्यानंतर नीता यांना आपल्या व्यवसायात वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यात विक्री, पॅकेजिंग, मार्केटिंग यांसारख्या समस्यांना त्यांना तोंड द्यावे लागत होते.

तरीही त्यांनी लोकांपर्यंत आपले प्रॉडक्ट पोहचवण्याचे थांबवले नाही. नीता यांनी आपले प्रॉडक्ट लोकांपर्यंत पोहचवले. हळूहळू या कंपनीचे मोठे नाव होऊ लागले. तसेच मोठमोठ्या हॉटेल्समधून त्यांना येणाऱ्या ऑर्डरचे प्रमाण वाढ होते.

त्यानंतर त्यांनी रिटेल मार्केटिंगमध्ये येण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी व्यवसाय संबंधित मीटिंग, सेमिनार यांच्यात जाण्यास सुरुवात केली ज्यामुळे नीता यांना व्यवसायात याचा मोठा फायदा झाला.

नीता यांनी रिटेल मार्केटिंग करत ग्राहकांपर्यंत पोहचण्यासाठी सोशल मीडियाची मदत घेतली. नीता यांनी एक फेसबुक पेज बनवून आल्या कंपनीची मार्केटिंग सुरू केली. सोबतच त्यांनी आपल्या प्रॉडक्टमध्ये फेसमास्क, स्क्रब यांचाही समावेश केला.

गेल्यावर्षी या व्यवसायाला नीता यांची २५ वर्षीय मुलगी अनुषा हिने जॉईन केले आहे. या दोघींनी मिळवून त्यांनी आता त्यांच्या कंपनीची वेबसाईट ओपन केली आहे, तसेच त्यांच्या प्रॉडक्टचे री-डिझाईनचे कामही या दोघींनी मिळून केले आहे.

आपल्या हर्बल कंपनीबद्दल बोलताना त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या. त्यांना कंपनी उभी करण्यासाठी जेव्हा पैशांची गरज पडली तेव्हा त्यांनी बँकेकडून कर्ज घेण्याचा प्रयत्न केला मात्र अनेक बँकांनी त्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ केली. तसेच अनेक बँकांनी तर सोबत पुरुष असेल तर कर्ज देता येईल असेही सांगितले.

त्यामुळे मी नेहमीच स्वतःवर विश्वास ठेवला. तुम्हाला जर तुमचा व्यवसाय चांगल्या स्थरावर न्यायचा आहे तर तुम्ही जोखीम उचलायला हवी. तसेच ग्राहकांच्या गरजांकडेही तुम्ही लक्ष ठेवायला पाहिजे, जर त्यांच्या गरजा पूर्ण होत असतील, तर तुमचा व्यवसाय नक्की यशस्वी होणार, असेही नीता सांगत असतात. १० हजारांपासून आपल्या हर्बल कंपनीची सुरुवात करणाऱ्या नीता यांची आजची वार्षिक उलाढाल ही कोट्यवधींची आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.